Saturday, April 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडडॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृहात विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणारे शुल्क रद्द करण्याची एसएफआयची मागणी

डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृहात विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणारे शुल्क रद्द करण्याची एसएफआयची मागणी

पुणे : पुण्यातील औंध येथील डॉ.पंजाबराव देशमुख या वसतिगृहात विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणारे शुल्क आणि अनामत रक्कम (डीपॉझिट) रद्द करा या मगणीचे निवेदन स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) च्या वतीने  मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह २०१८ साली औंध पुणे येथे, आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याणच्या धर्तीवर हे वसतिगृह सुरू करण्यात आले होते. सुरुवातीची दोन वर्ष विद्यार्थ्यांकडून कुठलेही शुल्क आकरण्यात येत नव्हते. परंतु आता १ ऑक्टोबर पासून हे वसतिगृह सुरू होत आहे. या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून तब्बल पाच हजार रुपये (डीपॉझिट) आणि प्रती महिना १ हजार रुपये एवढी रक्कम घेण्यात येत आहे, असे एसएफआयचे जिल्हा समिती सदस्य अभिषेक शिंदे यांनी सांगितले.

या आकारण्यात येणाऱ्या शुल्का संदर्भात एसएफआयच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी तथा सचिव पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना अधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेचे अध्यक्ष आणि वसतिगृह प्रमुख यांची तातडीची बैठक घेऊन उद्यापर्यंत या विषयावर योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले आहे. यावेळी एसएफआयचे जिल्हा कमिटी सदस्य अभिषेक शिंदे, पुणे शहर कमिटी सदस्य रामेश्वर आठवले, अनंत शेळके, अशोक जोगदंड आदी विदयार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय