Friday, December 6, 2024
Homeग्रामीणमाहूर तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याची "एसएफआय"ची मागणी

माहूर तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याची “एसएफआय”ची मागणी

माहूर : माहूर तालुक्यात खेडोपाडी गावांमध्ये बोगस डॉक्टर फिरत आहेत व वैद्यकीय सेवेच्या नावाखाली पैश्यांची लूट सुरू असल्याचा आरोप स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) माहूर तालुका समितीने एका निवेदनाद्वारे केला आहे.

खेड्यापाड्यात बोगस डॉक्टर फिरत असल्याची घटना  गंभीर असून या बोगस डॉक्टरांवर कायद्याने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी माहूर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) माहूर तालुका कमेटीने केली आहे. यावेळी तालुका अध्यक्ष विशाल नरवाडे, नांदेड जिल्हा सहसचिव प्रफुल्ल कउडकर, दिनेश राठोड व आकाश नायक उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय