पुणे : १९९० च्या दशकातील टाटा मोटर्स कामगार संघटनेचे लढाऊ कामगार नेते अशोक शिळीमकर यांचे कोरोनामुळे निधन झाल आहे.
अशोक शंकरराव शिळीमकर १९७८ ला टाटा मोटर्स पिंपरी येथे कामगार म्हणून रुजू झाले होते. १५ मार्च १९८९ ला कामगार वर्गात जबरदस्त भडका उडाला. त्यावेळी त्यांना व्यवस्थापनाने बडतर्फ केले.
अनेक शाळा ज्युनिअर कॉलेजवर त्यांनी मुलांना प्रदूषण, पर्यावरण वसुंधरा रक्षण यावर अनेक व्याख्याने आणि चित्र प्रदर्शने सादर करून या पृथ्वीवर आपण काही दिवसांचे पाहुणे आहोत याची समाजाला जाणीव करून दिली.
अशोक शिळीमकर हे नाट्य कलाकार, गायक आणि उत्कृष्ठ सूत्रसंचालक होते. भाषा प्रभू असलेले शिळीमकर यांचा तुळस आणि पर्यावरण या विषयावर अतिशय गाढा अभ्यास होता.