Friday, March 29, 2024
Homeजिल्हाविद्यापीठाच्या शुल्कवाढी विरोधातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी डॉ. बाबा आढाव येणार

विद्यापीठाच्या शुल्कवाढी विरोधातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी डॉ. बाबा आढाव येणार

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शुल्कवाढी विरोधात विद्यार्थी पुन्हा आक्रमक झाले आहे. या शुल्कवाढी विरोधात विद्यार्थ्यांनी ११ ऑक्टोबरला पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने या आंदोलनाचे पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी डॉ. बाबा आढाव यांची भेट घेतली आहे.

शुल्कवाढी विरोधातील आंदोलनाचा भाग म्हणून विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने शुल्कवाढी संदर्भात चर्चा व विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी कॉफी वीथ स्टुडेंटस् (Coffee With students) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ३ आॉक्टोबर रोजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या हिरवळीवर घेण्यात येणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या सामाजिक व राजकिय संघटनांचे प्रतिनिधी व विद्यार्थी यांच्यामध्ये शुल्क वाढ तसेच इतर विद्यार्थी प्रश्नांवर संवाद व चर्चा होणार आहे. “Coffee With students” या कार्यक्रमासाठी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने डॉ. बाबा आढाव यांची भेट घेऊन त्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.

शुल्क वाढी संदर्भात चर्चा व विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी “Coffee With students” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे बाबा आढाव यांनी निमंत्रण स्वीकारले आहे.

– राहुल ससाणे
सदस्य – विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती

कृती समिती वेगवेगळ्या सामाजिक तसेच राजकीय संघटना प्रतिनिधींना आवाहन करते आहे की आपण सर्वांनी फी वाढी सारख्या गंभीर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी उपस्थित रहावे. बाबा आढाव यांच्या येण्यामुळे आम्हाला ऊर्जा मिळाली आहे.

– तुकाराम शिंदे
सदस्य – विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती

बाबा आढाव यांना शुल्क वाढीची व आंदोलन संबंधिची माहिती देण्यात आली, त्यावेळी त्यांनी 3 तारखेला हजर राहतो असे सांगितले आहे. कोरोना काळानंतर शुल्क वाढ होणे ही गंभीर बाब असून यामुळे खूप साऱ्या कष्टकरी, शेतकरी वर्गातील विद्यार्थींचे नुकसान होणार आहे. आम्ही आपल्या संघर्षात तुमच्या सोबत आहोत असे आढाव यांनी सांगितले. यावेळी कृती समितीचे सदस्य तुकाराम शिंदे, राहुल ससाणे आणि पाठिंबा देण्यासाठी आलेले राहुल डंबाळे उपस्थित होते.

दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ८ ऑक्टोबरला विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेतली जाणार आहे, त्यावेळी आंदोलनांच्या संबंधित आपली भूमिका स्पष्ट करण्यात येणार आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी : ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का, शिवसेना कुणाची…

डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृहात विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणारे शुल्क रद्द करण्याची एसएफआयची मागणी

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल, ‘या’ तारखेला होणार मतदान

गुजरातचा सिंह महाराष्ट्रात तर महाराष्ट्राचा वाघ गुजरातमध्ये जाणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

ब्रेकिंग : पोलीस शिपाई संवर्गातील 20 हजार पदे भरण्याचा राज्य सरकारचा निर्णय

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय