Saturday, April 20, 2024
HomeNewsजेष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर,विश्वास मोरे,सुनील लांडगे यांना 'समाजदूत' पुरस्कार

जेष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर,विश्वास मोरे,सुनील लांडगे यांना ‘समाजदूत’ पुरस्कार

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर
पिंपरी चिंचवड येथील सृजन प्रतिष्ठान च्या वतीने स्व.दिगंबरराव कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या समाजदूत या पुरस्कारासाठी यावर्षी दैनिक लोकमतचे जेष्ठ वार्ताहर डॉ विश्वास मोरे, जेष्ठ पत्रकार श्री.अविनाश चिलेकर,महराष्ट्र टाइम्सचे श्री.सुनील लांडगे आणि पिंपरी चिंचवड साहित्य क्षेत्रातले तीन जेष्ठ साहित्यिक श्री.प्राध्यापक तुकाराम पाटील,श्री.राजेंद्र घावटे, श्री राज अहेरराव यांची निवड करण्यात आली आहे.


बीड जिल्ह्यातील पाडळी या गावचे जि. प. निवृत्त शिक्षक स्व. दिगंबरराव कुलकर्णी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पिंपरी चिंचवडस्थित विवेक कुलकर्णी या मुलाने वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सृजन प्रतिष्ठान ही संस्था स्थापन करून त्या संस्थेच्या माध्यमातून समाजातल्या कर्तृत्ववान व्यकींचा यथोचित पुरस्कार करण्याची अभिनव कल्पना अंमलात आणली आहे. कुठल्याही आधाराविना आपल्या अलौकिक कर्तृत्वाने आपले कर्म करताना ते सामाजिक भान आणि कर्तव्य जपत करणाऱ्या सामान्य ते असामान्य असा प्रवास करणाऱ्या कर्तृत्ववान व्यकींना गौरवीत करताना त्यांच्या पावलावर पाऊल टाकणारे अनेक समाजदूत,लोकदुत या निमित्ताने तयार होवोत, इतकीच माफक अपेक्षा असल्याची भावना सृजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री विवेक कुलकर्णी यांनी विशद केली.


मागील वर्षीच्या दुसऱ्या पुरस्कार सोहळ्यात
बीड जिल्ह्यातील आदर्श शिक्षक श्री प्रभाकरराव मानूरकर गुरुजी यांचे तिसरे अपत्य आणि बीड जिल्ह्यातील एक आदर्श पत्रकार श्री संतोषजी मानूरकर,जालना येथे असलेले आणि मूळचे ढोकवड येथील असलेले डॉ श्रीमंत मिसाळ यांना निमित्ताने गौरविण्यात आले होते,तर प्रथम वर्षी पुणे येथे झालेल्या पहिल्या कार्यक्रमात पिंपरी येथील जेष्ठ पत्रकार श्री विवेक इनामदार, डॉ सुवर्णाअभय दिवाण आणि जेष्ठ साहित्यिक सुरेश कंक यांना गौरविण्यात आले होते.डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या पुरस्कार सोहळ्याचे वितरण केले जाणार आहे.स्मृतीचिन्ह,एक ग्रंथ आणि शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे रूप असेल.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय