Sunday, June 8, 2025
---Advertisement---
---Advertisement---

जेष्ठ आंबेडकरी लेखिका शांताबाई कांबळे यांचे निधन!

पुणे : पहिल्या दलित स्त्री लेखिका तसेच ज्येष्ठ आंबेडकरवादी साहित्यिक शांताबाई कांबळे यांचं दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी सकाळी 7 वाजता  पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं. त्या 101 वर्षाच्या होत्या. त्या शेवटच्या काळात पुण्यात आपल्या मुलीकडे रहात होत्या. त्यांच्यावर शेवटचे संस्कार कोपरखैरणे येथे बौद्ध धर्माच्या पद्धतीने होतील. दलित पँथर चे अध्यक्ष दिवंगत प्रा. अरुण कांबळे यांच्या त्या मातोश्री होत्या. 

---Advertisement---

शांताबाई कांबळे ह्या दलित स्त्री लेखिका, शिक्षिका व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यात महुद बुद्रुक या गावी झाला. १९५२ साली पुण्याच्या विमेन्स कॉलेजमधून ट्रेनिंग कॉलेज वर्ष दुसरे वर्ष त्या उत्तीर्ण झाल्या. काही काळ सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. २८ फेब्रुवारी १९८१ रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर मराठी वाङ्मयातील दलित स्त्रीचे पहिलेच आत्मकथन त्यांनी लिहिले. 

माज्या जल्माची चित्तरकथा हे त्याचं आत्मवृत्त विशेष गाजलं. पहिल्यांदा मार्च १९८३ साली ते पूर्वा मासिकात आलं, त्या आधी साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेंद्र बारलिंगे यांनी या पुस्तकाला १९८२ आली अनुदान दिलं आणि ते पूर्वा प्रकाशना तर्फे १७ जून १९८६ रोजी पुस्तक रूपात आलं. ‘नाजुका’ ह्या नावाने मुंबई दूरदर्शनवर चित्रमालिकेच्या स्वरूपात १० ऑगस्ट १९९० पासून हे आत्माकथन सादर झाले. फ्रेंच, इंग्रजी, हिंदी भाषेत पुस्तकरूपाने अनुवाद प्रसिद्ध झाले. ‘फेमिना’ मासिकाच्या काही अंकांतून इंग्रजीतअनुवादित झाले. शांताबाई कांबळे यांचा अनेक पुरस्काराने सन्मान झाला आहे. त्यांत दलितमित्र हा एक सन्मान आहे. त्यांच्या पुस्तकाचे अनेक भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय भाषेत भाषांतर झाले आहे.

---Advertisement---

त्यांच्या मागे मुले, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.. त्यांचे पती कृष्णाजी नारायण कांबळे (गुरुजी), मी कृष्णा हे त्यांचे आत्मकथन. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे , तीरमारे गुरुजी यांचा सहवास त्यांना लाभला. त्यांचा अंत्यविधी सायंकाळी ७ वाजता कोपखैराणे येथिल स्मशानभूमीत करण्यात येणार आहे.

Lic
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles