तीन विश्वस्तांना तीन महिने मुदतवाढ
आळंदी /अर्जुन मेदनकर : आषाढी वारी सन २०२३ या वर्षातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख पदी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त विधीतज्ञ विकास ढगे पाटील यांची निवड करण्यात आली असल्याचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी सांगितले. तत्पूर्वी आळंदी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या सर्व सहा ही विश्वस्ताच्या मुदती संपल्याने तीन महिन्यां साठी योगेश देसाई, विकास ढगे पाटील, लक्ष्मीकांत देशमुख या तीन विश्वस्तांना पुणे जिल्हा प्रमुख तथा पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी मुदतवाढ दिली आहे.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी विश्वस्त मंडळाच्या तीन विश्वस्तांना मुदतवाढ देण्याचा निर्णय आल्यानंतर प्रमुख विश्वस्त यांनी येत्या ११ जून ला माऊलींचे पालखी सोहळ्याचे आळंदी मंदिरातून प्रस्थान होणार असल्याने सोहळ्याचे नियोजन प्रभावी व्हावे यासाठी अनुभवी विश्वस्त विधीतज्ञ विकास ढगे पाटील यांची पालखी सोहळा प्रमुख पदी निवड करण्यात येत असल्याचे जाहीर केले. या निवडीपूर्वी त्यांनी तीन वेळा सोहळ्याचे प्रमुख पदी कामकाज केले आहे. आता त्यांची चवथ्यादा निवड झाली आहे.
या पूर्वी सन २०१८, २०२१, २०२२ चे पालखी सोहळ्यात सोहळा प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. तसेच सन २०१८ ते २०२० प्रमुख विश्वस्त म्हणून दोन वर्ष कामकाज केले आहे. अॅड. ढगे पाटील यांनी पुणे बार असोशिएशनचे अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. खेड तालुक्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे त्यांनी उपाध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे. आता पुन्हा सलग चवथ्यादा सन २०२३ पालखी सोहळ्याचे प्रमुख पदी त्यांची निवड मुदतवाढ केल्याने झाली आहे. या निवडीचे वारकरी संप्रदायातून तसेच आळंदी व पंचक्रोशीतून स्वागत करण्यात आले. सद्या सहा पैकी तीन विश्वस्त यांच्या निवडीची प्रक्रिया सुरु असून विश्वस्त रिक्त जागेच्या दाखल प्रस्तावावर अद्याप अंतिम निर्णय प्रलंबित आहे. पालखी सोहळा जवळ आल्याने आणि रिक्त जागा भरण्यास विलंब होत असल्याने तीन विश्वस्तांना तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे.
---Advertisement---
---Advertisement---
माऊली पायी वारी पालखी सोहळा प्रमुख पदी विकास ढगे पाटील यांची निवड.
---Advertisement---
- Advertisement -