Photo : Twitter |
मुंबई : विमानतळावर प्रत्येक प्रवाशांच्या बॅगची तपासणी केली जाते. बंदी असलेल्या वस्तू विमानातून वाहतूक केल्यास त्या प्रवाशाची चौकशी करून कारवाई केली जाते. मात्र, आयपीएस अरुण बोथरा यांच्या बॅगेत जे आढळले त्याची सध्या जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
वरिष्ठ आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांना जयपूर विमानतळावर सुरक्षा रक्षकांनी त्यांची बॅग उघडण्यास सांगितलं. त्यावेळी त्यांच्या बॅगमध्ये हिरव्या वाटाण्याच्या शेंगा मोठ्या प्रमाणावर आढळल्या. हा फोटो आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांनी ट्वीटरवर शेअर केला असून तो प्रचंड व्हायरल झाला असून नेटकरी त्यावर कमेंट करत आहेत.
Security staff at Jaipur airport asked to open my handbag ? pic.twitter.com/kxJUB5S3HZ
— Arun Bothra ?? (@arunbothra) March 16, 2022
अरुण बोथरा यांनी फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “जयपूर विमानतळावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मला हॅण्डबॅग उघडून दाखवण्यास सांगितलं”.
Last time when I was coming back from Home, I paid Rs. 2,000 to @IndiGo6E guys for ‘लौकी’ & ‘बैगन’ at Airport.
— Awanish Sharan (@AwanishSharan) March 16, 2022
यावर आयएएस अवनिश शरण यांनी देखील ट्विटवरून एक किस्सा सांगितला आहे. ते म्हणाले की, मी एकदा घरी जात असताना दुधी भोपळा आणि वांगी नेत होतो, त्यासाठी विमानतळावर २ हजार रुपये द्यावे लागले होते.