Friday, April 11, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Sharad Pawar : शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर! 

Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. दुसऱ्या यादीमध्ये २ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.  NCP Sharad Pawar Group 

---Advertisement---

यामध्ये बीड- लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ट्विटर करत यादी जाहीर केली आहे. ट्विट मध्ये म्हटलंय, “विजयाचा निर्धार पक्का करून ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक २०२४ ची दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चला, आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या साथीने ‘तुतारी’ला ललकारी देऊया, आणि दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडवूयात.…”

---Advertisement---

शरद पवार गटाने ३० मार्च रोजी जाहीर केलेल्या यादीमध्ये वर्धामधून अमर काळे, दिंडोरीमधून भास्कर भगरे, बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे, अहमदनगरमधून निलेश लंके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आतापर्यंत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून ७ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles