Friday, March 29, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी-चिंचवड व चाकणमधील कंत्राटी कामगारांचा दुसरा ऐतिहासिक वेतनवाढीचा करार

पिंपरी-चिंचवड व चाकणमधील कंत्राटी कामगारांचा दुसरा ऐतिहासिक वेतनवाढीचा करार

स्टार इंजिनिअर्स मध्ये वेतनवाढ करार

पुणे
: कामगार क्षेत्रात ४० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या शिवाजीराव खटकाळे भाऊ यांनी कंत्राटी कामगारांचा वेतन वाढीचा करार संपन्न केला.तीन वर्षाच्या कालावधीत मध्ये जास्तीत जास्त ६४०० /-रू व कमीत कमी ६०००/-रु वेतन वाढ तसेच शासनमान्य DA असा वेतन वाढीचा करारानिमित्त वार्षिक सर्वसाधारण सभा व स्नेह मेळावा संपन्न झाला.

प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल व जनरल सेक्रेटरी उत्कर्ष कामगार संघटना शिवाजीराव खटकाळे तसेच अध्यक्ष राष्ट्रवादी पिंपरी चिंचवड कामगार सेल व अध्यक्ष अल्फा लावल कर्मचारी कामगार संघटना किरण देशमुख, संघटक महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल दिपक मोंडोकार,कष्टकरी कामगार संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल स्वप्निल भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत रोटरी क्लब ऑफ पिंपरी येथे संपन्न झाला..याप्रसंगी स्टार इंजिनिअर्स चाकण अध्यक्ष सचिन पवार,उपाध्यक्ष लक्ष्मण राठोड,ज्ञानेश्वर गिरी,अनिकेत त्रिभुवन,अनिकेत गाडे, हेमंत नेटके,राहुल कोर्हाळे तसेच महिला भगिनी व कामगार बंधु उपस्थित होते.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय