Sunday, April 20, 2025
---Advertisement---
---Advertisement---

धक्कादायक : खिशात ठेवलेल्या फोनचा स्फोट तरूणाच्या गुप्तांगाला गंभीर दुखापत

राजगढ : मध्यप्रदेशातील राजगढ जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. १९ वर्षीय अरविंद नावाच्या तरुणाच्या पँटीच्या खिशात ठेवलेल्या मोबाइल फोनचा स्फोट (Mobile explosion) झाल्याने त्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. या स्फोटामुळे अरविंदच्या गुप्तांगाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

---Advertisement---

ही भीषण घटना राजगढमध्ये घडली, अरविंद आपली दुचाकी घेऊन जात होता. त्याच्या खिशात ठेवलेला सेकंडहँड मोबाइल फोनचा अचानक स्फोट झाला. स्फोटामुळे अरविंद दुचाकीवरून खाली पडला, त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. फोन खिशात असल्याने त्याच्या गुप्तांगाला देखील गंभीर दुखापत झाली आहे. आजूबाजूच्या लोकांनी तातडीने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले असले तरी, त्याला बरे होण्यासाठी काही काळ रुग्णालयात राहावे लागणार आहे.

स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट | Mobile explosion

मिळालेल्या माहितीनुसार, अरविंदने नुकताच हा सेकंडहँड मोबाइल फोन खरेदी केला होता. पण त्याला कधीच कल्पना नव्हती की हा फोन त्याच्यासाठी इतका धोकादायक ठरेल. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, फोन जास्त चार्ज झाल्याने किंवा त्यातील बॅटरी निकृष्ट दर्जाची असल्याने ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

---Advertisement---

या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अरविंदने हा सेकंडहँड फोन कोठून खरेदी केला आणि त्याच्या स्फोटामागचे कारण काय होते, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हे ही वाचा :

सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच, अहवालात खळबळजनक खुलासे

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आतापर्यंत १८ हजार ८०० शिक्षकांची भरती

आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार, दिशा सालियन प्रकरणी वडिलांचे गंभीर आरोप

राज्यात लवकरच 10,500 रिक्त पदांसाठी पोलीस भरती होणार ; देवेंद्र फडणवीसांची घोषणा

नागपूर हिंसाचार प्रकरण ; हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले पोलिसांसमोर आत्मसमर्पण

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles