Thursday, April 24, 2025
---Advertisement---
---Advertisement---

महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या उपोषणाचा दुसरा दिवस

पिंपरी दि.१९ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका ग क्षेत्रीय कार्यालयाकडून अत्यंत चुकीच्या पद्धतीने कारवाई सुरू असून गोरगरीब विक्रेत्यावर अन्याय कारवाई करण्यात येत आहे ग क्षेत्रीय अधिकारी किशोर ननावरे यांचेवर मनपा आयुक्तांनी कारवाई करावी गोरगरिबांना छळू नका अन्यथा यापुढेही बेरोजगारीने अराजकता येईल असा इशारा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी केला दिला. (PCMC)

---Advertisement---

नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयासमोर थेरगाव येथे मुदत उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले.

आजचा दुसरा दिवस असताना क्षत्रिय अधिकारी किशोर ननावरे हे आंदोलकांना न भेटता ते केवळ श्रीमंतासाठी काम करत असून गोरगरिबांना चिरडण्याचे काम करत आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रात अनेक अवैध काम अनेक आहेत परंतु त्यांच्यावर कारवाई करने सोडून गोरगरिबावर कारवाई करण्यात येत आहे. श्रमिकांना त्यांच्यासाठी असणारा कायद्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने अस्वस्थता पसरवणाऱ्या, रोजगार हिसकावून घेणाऱ्या ननवरे यांच्यावर त्वरित कारवाई करावी आणि विक्रेत्यांना नियमाप्रमाणे लाभ द्यावेत. (PCMC)

---Advertisement---

महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, बालाजी लोखंडे, सचिन बोर्डे, दत्ता शेरखाने, रवींद्र गायकवाड, नंदू आहेर, सुनील भोसले, मुजमिल काझी, शरीफ सय्यद, सोमनाथ मारने, कालिदास गायकवाड उपोषणकर्ते अक्का लोंढे, मंगल श्रीराम, जरीना शेख, राजेंद्र कुटकर, सलीम डांगे, नौशाद मणियार, नवनाथ जगताप यांचेसह ग आणि ड क्षेत्रीय विभागातील विक्रेते उपस्थित होते.

हे ही वाचा :

पुण्यात बसला भीषण आग ; चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू, पाच जण गंभीर जखमी

सुनीता विल्यम्स आणि सहकाऱ्यांची अंतराळातून यशस्वी पृथ्वीवर पुनरागमन

गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून तीन उमेदवारांची यादी जाहीर

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles