Thursday, December 12, 2024
Homeजुन्नरSchool : इनामवाडी येथे विद्यार्थ्यांनी भरविला आठवडे बाजार

School : इनामवाडी येथे विद्यार्थ्यांनी भरविला आठवडे बाजार

जुन्नर / आनंद कांबळे : जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इनामवाडी येथे दिनांक 17.2.204 रोजी सकाळी सत्रात शाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक व शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडे बाजार व  बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. School : Weekly bazaar organized by students at Inamwadi

मुले सकाळपासूनच तयारीत व आनंदी दिसत होती प्रत्यक्ष बाजाराची मांडणी झाल्यावर या आनंद मेळाव्याचे उद्घाटन कुसुरचे सरपंच दत्तात्रय ताजने यांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर आठवडे बाजाराला सुरुवात झाली बहुसंख्य पालक व परस्परांतील माणसे ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांनी मुलांनी लावलेले भाजीपाल्याचे दुकाने यांना प्रत्यक्ष भेट देऊन मुलांना व्यवहाराचे ज्ञान प्राप्त करून दिले. मुलांनीही जादा दिलेली रक्कम बाजारभावाप्रमाणे घेऊन उर्वरित पैसे संबंधितांना परत केले. या बाजारामधून मुलांचे संख्याज्ञान तर वाढीस लागलेच शिवाय संख्यात्मक क्रिया यांचाही नकळत बोध झाला.

वस्तूंची देवाणघेवाण करताना करावा लागणारा व्यवहार कुशलतेने केल्याने त्यांना व्यवहार ज्ञान या आठवडे बाजारातून आले मुले खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना आपला मला कसा विकता येईल यासाठी अनेक क्लुप्त्या वापरत होती बाजार भाव सांगत होती. आपला जास्तीत जास्त भाजीपाला कसा विकला जाईल. याकडेही त्यांचं बारीक लक्ष होतं एकूणच या आठवड्या बाजारातून मुलांना खूप काही शिकायला मिळालं. आपण आणलेल्या मालाची झालेली विक्री व त्यामुळे मिळालेले पैसे व्यवहारात झालेला फायदा या सर्व बाबीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता एकूणच आठवडे बाजार उत्साहात संपन्न झाला.

याप्रसंगी प्रामुख्याने माजी उपसरपंच संदीप दुराफे, कुसुर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राजू भगत, झांज पथकाचे अध्यक्ष अनिल मोधें, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास काळे, रेश्मा केदार, बाळासाहेब भगत, साक्षी भालेकर, अविनाश जाधव, शंकर मोधे, कुमेश मोधे, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या बाल आनंद मेळाव्याचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक शांताराम मोधे, पदवीधर शिक्षिका श्रीमती सुमन उतळे, उपशिक्षिका अनामिका मोढवे व सविता उगले यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत व आभार उपशिक्षक निवृत्ती दिवटे यांनी केले.

संबंधित लेख

लोकप्रिय