Saturday, April 20, 2024
Homeराज्यसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय, "या" विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय, “या” विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ

पुणे : गेल्या दीड वर्षांपासून देशभरात कोरोनाच्या महामारीने थैमान घातले आहे, त्यातील कोरोनाची दुसरी लाट अधिकच घातक ठरली त्यात अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे पालक गमवावे लागले, या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मोठा निर्णय घेतला आहे.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठांना फी कपातीसंदर्भात आवाहन केलं होतं. आवाहनाला प्रतिसाद देत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आई किंवा वडील या दोघांपैकी आणि दोन्ही पालक गमावले आहेत त्यांना 100 टक्के फी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयामुळं अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय