Sunday, March 16, 2025

सावित्रीबाई फुले जयंती दापोली नंबर 1 शाळेत उत्साहात साजरा

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना..

सावित्रीबाई फुले यांचे कार्य महान – मुख्याध्यापिका अश्विनी करंदीकर

दापोली : 3 जानेवारी रोजी  क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती दापोली नंबर 1 या मराठी शाळेत उत्साहात साजरा करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी करंदीकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण केला. शाळेतील पदवीधर शिक्षिका विद्या मुरूडकर, स्वाती खानविलकर, उपशिक्षिका पिंगला पावरा यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून पूजन केली. त्या पाठोपाठ विद्यार्थ्यांनी सुद्धा सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून पूजन केले. 

         

राज तांबे इयत्ता 6 वी व वेदांत राणे इयत्ता 7 वी  ह्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांचे विषयी आपली भाषणे केली. सावित्रीबाई फुले ह्या महान समाजसुधारक होत्या. त्यांनी महिलांचे अधिकार सुधारण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते, अशा शब्दांत शाळेतील पदवीधर शिक्षिका विद्या मुरूडकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. केशवपन प्रथा बंद करण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी नाभिक समाजातील लोकांना प्रबोधन केले, संप घडवून आणला व पुनर्विवाह कायदा व्हावा यासाठी प्रयत्न केले. सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली, असे शाळेतील शिक्षिका स्वाती खानविलकर यांनी मार्गदर्शन केले.

सावित्रीबाई फुले महिलांना सन्मान मिळवून दिला – पिंगला पावरा 

सावित्रीबाई फुले ह्या शिक्षण तज्ञ व कवयित्री सुद्धा होत्या. त्यांनी मुलींच्या शिक्षण प्रचारावर अधिक भर दिला. निरक्षर महिलांना शिक्षण दिले. त्यांना बोलके केले. महिलांचे अधिकार समजावून सांगितले. सती प्रथा, केशवपन, जातीभेद इत्यादी वाईट प्रथांचा कडाडून विरोध केला. त्यामुळे आज वाईट प्रथा बंद झाल्या आहेत व स्त्रीयांना सन्मानाने जगता येत आहे. त्यांनी आपले पती ज्योतिबा फुले यांना प्रत्येक कामात चांगली साथ दिली. म्हणून त्यांना क्रांती ज्योती म्हणून ओळखले जाते, अशा शब्दांत शाळेतील शिक्षिका पिंगला पावरा यांनी संबोधित केले.

          

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका  म्हणून सावित्रीबाई फुले यांना ओळखले जाते. सन 1848 रोजी भिडेवाड्यात सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे पती ज्योतीराव फुले यांच्या सोबत मुलींची पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुले यांची जन्मतारीख म्हणजे 3 जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः करून मुलींच्या शाळेत बालिका दिन म्हणून साजरा करतात. मुलींना शिक्षण देतांना त्यांना खूपच त्रास सहन करावा लागला. तरीही त्यांनी शिक्षण प्रचाराचा उपक्रम त्यांनी सुरूच ठेवला. म्हणून त्यांना स्त्री शिक्षणाची जननी मानले जाते. त्यांचे कार्य हे महान होते. त्या सर्व स्त्रीयांसाठी आदर्श आहेत. अशा क्रांति ज्योती सावित्रीबाई फुले यांना मी कोटी कोटी वंदन करते.अशा शब्दांत शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी करंदीकर अश्विनी करंदीकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles