नाशिक : नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अर्थपुरवठा करणारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीत आली आहे. 12 लाख ठेवीदार, 10 हजार वर संस्था सभासद असलेली 1100 वर गावपातळीवर कार्यरत विका सोसायटीच्या मार्फत शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणारी आशिया खंडातील सर्वात मोठी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणारी बँक अडचणीत आली आहे. नाशिक जिल्ह्यातील सहकार चळवळ अडचणीत आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील सहकार चळवळ मजबूत होण्यासाठी जिल्हा बँक अडचणीतुन बाहेर यावी यासाठी नाशिक जिल्ह्यातील सहकार चळवळीतील मान्यवरांची बैठक राजू देसले यांनी बोलावली होती. या संदर्भात विचार बैठक 20 डिसेंबर 2021 वेळ दुपारी 3 वा. ठिकाण नाशिक जिल्ह्या मजूर संस्था फेडरेशन कार्यालय श्रम सहकार बिल्डिंग, पाण्याच्या टाकी समोर, वेद मंदिर जवळ तिडके कॉलनी, नाशिक मालेगाव मर्चंट बँक चे चेअरमन ,तसेच नाशिक जिल्ह्या बँक चे माजी चेअरमन राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकीत नाशिक जिल्ह्यातील ऐतिहासिक सहकार चळवळीचा वारसा असलेली. शेतकऱ्यांना कर्जपुरवठा गावपातळीवर विका सोसायटीच्या मार्फत करणारी बँक अडचणीत आली आहे. त्यावरती चर्चा करण्यात आली .
नाशिक जिल्ह्यातील जिल्हा बँक वाचवा!! ठेवीदार वाचवा!! विका सोसायटी वाचवा!! शेतकरी वाचवा!! सहकार वाचवा!! चळवळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा बँक अडचणीतून बाहेर आणण्यासाठी जिल्यात सकारात्मक चळवळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला., राज्य सरकार, केंद्र सरकारने सहकार चळवळ वाचवण्यासाठी मदत करावी. ठेवीदार हित, शेतकऱ्यांना कर्जपुरवठा, विका सोसायटी चा विकास साठी काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील मान्यवर ना एकत्रित करून गावपातळी पासून जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी दुपारी 3 वा. जिल्हा बँक प्रशासक ची भेट देऊन या मोहिमेची भूमिका वेक्त करण्यात येणार आहे.
चार्टर्ड अकाउंट (सनदी लेखापाल), लेखापरीक्षक यांचेही मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत व्यापक चर्चा करण्यात आली. बँक वाचवण्यासाठी उपाययोजना व कृतीचीच चर्चा ह्या मंचावर होईल. असा निर्णय एकमताने घेण्यात आला. विकास सोसायटी वाचल्या पाहिजेत विकास झाला पाहिजे यासाठी स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येणार आहे. ठेवीदाराना ठेव मिळण्यासाठी तसेच पुन्हा जिल्हा बँक खाते सुरू करण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. बैठकीस सहकार चळवळ तिल मान्यवर विकास सोसायटी नेते मनोहर देवरे, संपतराव सकाळे, शांताराम ठाकरे, संपतराव वक्ते, राजेंद्र पवार, शिवाजी कासव, किरण टिळे, शिवाजी राउंदल, दिनकर उगले,संभाजी पवार आदी उपस्थित होते. प्रास्तविक राजू देसले यांनी केले. आभार मनोहर देवरे यांनी मानले.