Tuesday, April 22, 2025
---Advertisement---
---Advertisement---

“खेती बचाओ, लोकतंत्र बचाओ” वणी येथे किसान सभेचे आंदोलन, राष्ट्रपतीला पाठविले निवेदन

---Advertisement---

वणी : दिल्ली येथील कृषी कायदे रद्द व्हावीत यासाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ७ महिने पूर्ण होण्याच्या अनुषंगाने देशात संविधानिक तरतुदीच्या विरोधात घेण्यात येत असलेल्या धोरणामुळे व केल्या जाणाऱ्या कायद्यामुळे या बाबतीत राष्ट्रपती महोदयांनी लक्ष घालून संविधानाचे रक्षण करावे यासाठी आज (२६ जून) रोजी देशव्यापी आंदोलन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर वणी येथेही किसान सभा व माकपच्या वतीने एक दिवसीय धरणे व निदर्शने आंदोलन उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व कॉ. शंकरराव दानव, कॉ. कुमार मोहरमपुरी व कॉ. ऍड. दिलीप परचाके यांनी केले.

---Advertisement---

देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे व भांडवलदारांच्या हिताचे कृषी कायदे करून केंद्र सरकारने भारतीय जनतेला धोक्यात मारण्याचे षडयंत्र रचले असल्याची टीका किसान सभेने केली आहे. 

दिल्लीच्या सीमेवर शेतकरी गेल्या ७ महिन्यांपासून सातत्याने आंदोलन करीत असताना त्यांच्या सोबत कामगार, युवक व विद्यार्थी सहकार्य करीत आंदोलन करीत आहेत. आजच्या आंदोलनात सुद्धा देशभरात विद्यार्थी, युवक, महिला उतरल्या होत्या. यावेळी स्थानिक अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. 

या आंदोलनात खुशालराव सोयाम, सुधाकर सोनटक्के, गजानन ताकसांडे, रामभाऊ जिड्डेवार, नंदू बोबडे, मनोज काळे, आनंदराव पानघाटे, भास्कर भगत, दशरथ येनगंटीवार, तुकाराम भगत, ऋषी कुळमेथे, वैभव मजगवळी, गंगाराम मेश्राम आदींसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles