Wednesday, January 15, 2025
Homeराष्ट्रीयसौंदत्ती रेणुका माता मंदिर बंद राहणार, प्रशासनाचा निर्णय

सौंदत्ती रेणुका माता मंदिर बंद राहणार, प्रशासनाचा निर्णय

बेळगाव : राज्यातील सर्व मंदिरे खुली करण्याचे आदेश शासनाने दिले असले, तरी कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सौंदत्ती येथील रेणुका मंदिर त्याचबरोबर जोगणभाव बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिरामध्ये रोजचे विधिवत पूजन करण्यात येणार असून, सार्वजनिक दर्शन मात्र पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. भक्‍तांनी येऊ नये, असे आवाहनही जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.

सौंदत्ती येथील रेणुका देवस्थानच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, गोवा आणि आंध्र प्रदेशातील भक्‍त मोठ्या प्रमाणात येत असतात. सध्या इतर राज्यांमध्ये कोरोना, त्याबरोबरच डेल्टा प्लसने थैमान घातले असून, याचा संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी यापुढील काळातही रेणुका देवस्थान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

देवस्थानाबरोबरच परिसरातील दुकानांनाही बंदी घालण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत या परिसरातील व्यवसाय आणि देवस्थान बंद राहणार आहे. देवस्थानातील रोजची पूजा मोजक्या पुजार्‍यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय