Thursday, January 23, 2025

सातारा प्रतिसरकार हे स्वातंत्र्य आंदोलनातील सोनेरी पान – ॲड.सुभाष पाटील

सांगली / राहुल खरात : गोरगरीब महिला व सामान्य जनतेवर होणारे अन्याय निपटून काढणारे, लोकांचा विश्वास संपादन करून, लोकजीवनाशी एकरुप झालेले;लोकाश्रयाच्या बळावर ४४ महिने ब्रिटिश साम्राज्य सत्तेला हादरा देणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखालील सातारा प्रतिसरकार हे स्वातंत्र्य आंदोलनातील सोनेरी पान आहे. असे प्रतिपादन क्रांतिसिंहांचे नातू ॲड. सुभाष पाटील यांनी केले. 

रामानंदनगर येथे समाजवादी प्रबोधिनी व व्ही. वाय. आबा पाटील समाज प्रबोधन ॲकॅडमी आयोजित आचार्य शांतारामबापू गरुड व्याख्यानमालेत सातारा प्रतिसरकार या विषयावरील दुसरे पुष्प त्यांनी गुंफले.

धर्म आणि राजकारण याच्या सांगडीने अधोगती होते – प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

सातारा प्रतिसरकारने संकटकालीन परिस्थिती आणि प्रसंगानुसार लढातंत्र विकसित करुन चळवळ व शस्त्रसामुग्रीसाठी ब्रिटिश सरकारच्या खजिन्याची लुट केली असे ते म्हणाले. 

याप्रसंगी आजादी का अमृतमहोत्सव फलकाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित करण्यात आले. स्वागत प्रास्ताविक व सुत्रसंचलन आदम पठाण यांनी केले, तर समारोप शिवाजीराव इंगळे यांनी केला.

व्हीडिओ व्हायरल : इंधन दरवाढीच्या प्रश्नावर बाबा रामदेव संतापले

याप्रसंगी व्ही. वाय. पाटील, प्रा. बी. एन पवार, पी. के. माने, उत्तमराव सदामते, जनार्दन पाटील, महम्मद सैदापूरे बडेभैय, मारुती सावंत, प्रमोद मिठारी, प्रकाश राजाराम पाटील, दिपक घाडगे, संपतराव गायकवाड, नारायण पाटील, कवी संदिप नाझरे, विष्णू फडतरे आदि मान्यवर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles