Saturday, April 20, 2024
Homeग्रामीणसावित्रीबाई फुले यांच्या जयतीनिमित्त सावर्णा गावात नवीन वाचनालय.

सावित्रीबाई फुले यांच्या जयतीनिमित्त सावर्णा गावात नवीन वाचनालय.

                                    

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सावर्णा या आदिवासी गावात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नवीन वाचनालय सुरू करण्यात आले. हे वाचनालय सोशल नेटवर्क फोरम यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आले. या वाचनालायला अलकॉन इलेट्रॉनिक, ग्रामपंचायत आणि महिला बचत गट यांच्या मार्फत वाचनालय सुरू करण्यास मदत मिळाली आहे. हे वाचनाला गावातील सर्व वाचकासाठी खुले करण्यात आले आहे. गावात एक चांगले वाचनालय सुरू झाल्यामुळे गावात आनंदाचे वातावरण दिसून आले आहे.

सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करून वाचनालय सुरू करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी सोशल नेटवर्क फोरमचे शिंदे सर, माकपचे नेते उपसभापती महेश टोपले, रेणुका बोसारे, पद्माताई भोये, कमलाकर बोसारे सरपंच मनोहर राथड आदी गावकरी मंडळीची उपस्थिती होती. 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय