Friday, November 22, 2024
Homeआंबेगावजुन्नर व आंबेगाव तालुक्यातील सरपंच, उपसरपंच आता आंदोलनाच्या पवित्र्यात

जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील सरपंच, उपसरपंच आता आंदोलनाच्या पवित्र्यात

मंचर : जून २०२० साली झालेल्या चक्रीवादळामुळे बाळ हिरड्यांच्या झालेल्या नुकसानीची नुकानभरपाई मिळवण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सुरू केलेल्या उपोषणाची व्याप्ती वाढत आहे.. या आंदोलनास CITU कामगार संघटनेचे राष्ट्रीय नेते कॉ. डी.एल.कराड यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. Pune

शिवसेना शिंदेगटाचे नेते विजय आढारी, बिरसा ब्रिगेड चे जुन्नर आंबेगाव व खेड चे पदाधिकारी तसेच माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराम लांडे यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.

त्याचबरोबर आंबेगाव जुन्नर तालुक्यातील चिखली गावचे सरपंच जयराम जोशी, राजपुर गावचे सरपंच चंद्रकांत लोहकरे, गोहे बु. गावचे सरपंच महादेव भवारी, तिरपाड, डोन, न्हावेड, नानवडे ग्रुप ग्रामपंचायत चे सरपंच सोमा दाते, बोरघर ग्राम पंचायत चे उपसरपंच राजू घोडे, सदस्या प्रतिक्षा बांबळे, आघाने पिंपरगणे गावचे माजी सरपंच चिंतामण वडेकर, तेरुंगण – कोंढवळ – निगडाळे ग्रुप ग्राम पंचायत चे माजी सरपंच दिपक चिमटे, सांगनोरे गावचे लोकनियुक्त सरपंच गणेश मराडे, 

जुन्नर तालुक्यातील चावंड माणकेश्वर ग्राम पंचायत चे सरपंच सुमनताई लांडे, जांभोरी चे माजी उपसपंच विलास केंगले, विभागीय वनहक्क समितीचे सदस्य किरण लोहकरे, होण्या बाबु केंगले प्रतिष्ठान चे अध्यक्ष व सामजिक कार्यकर्ते हेमंत केंगले व प्रा. अक्षय साळवे तसेच हडसर ग्राम पंचायत च्या लोकनियुक्त सरपंच निता कारभळ उपसरपंच गंगाराम सांगडे, तळेरान गावचे सरपंच गोविंद साबळे, खुबी गावचे सरपंच काठे, तसेच माजी पंचायत समिती सदस्य सुभाष तळपे, खेड तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक तळपे व ऍड. महेंद्र थोरात, विकास भाईक, शिरूर तालुक्यातील कार्यकर्ते संतोष कांबळे, संतोष सुर्यवंशी आदींनी उपस्थित राहून आंदोलनात जाहीर पाठिंबा दिला. 

तसेच हे आंदोलन चिवटपणे सुरू ठेवण्याची जबाबदारी घेत दररोज आपापल्या गावातून लोकांना आंदोलनात उतरविण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त करून जर सरकारने या प्रश्नावर निर्णय घेतला नाही तर येत्या निवडणुकीत प्रस्थापितांना निवडणुकीत धूळ चरल्याशिवर राहणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.

संबंधित लेख

लोकप्रिय