Friday, March 29, 2024
Homeग्रामीणनाशिक : सरण ही थकले मरण पाहुणी.. मरणानंतरही भोगाव्या लागतात नरक यातना

नाशिक : सरण ही थकले मरण पाहुणी.. मरणानंतरही भोगाव्या लागतात नरक यातना

सुरगाणा / दौलत चौधरी : सरण ही थकले मरण पाहुणी.. मरणानंतरही भोगाव्या लागतात  नरक यातना.. या काही एखाद्या कवितेतील भावार्थ स्पष्ट करणा-या ओळी नसून प्रत्यक्ष सुरगाणा तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायत मधील पिळूकपाडा येथे स्मशानभूमी अभावी भरपावसात एका मृतदेहाची झालेली अवहेलनेची वस्तुस्थिती आहे.

पिळुपाडा येथे एका वाहन चालकाचे आक्समिक निधन झाले. त्याचवेळी सकाळ पासूनच संततधार पावसामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी गावात अद्यापही स्मशानभूमी शेडच नसल्याने अंत्यविधी करण्यासाठी ग्रामस्थांना सरण रचतांना चितेवर चक्क ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला. कसे बसे सरण रचल्यानंतर संततधार पावसामुळे चितेला अग्नी कसा द्यायचा, असा प्रश्न नागरिकांना पडला. 

हेही वाचा ! देवस्थानच्या जमिनींवर पुजाऱ्यांचा अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

कित्येकदा संततधार पावसामुळे मृतदेह अर्धेच जळतात. पुन्हा पाऊस उघडल्यावर लाकडे टाकावी लागतात. काही जागरूक ग्रामस्थांनी सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेली स्मशानभूमीत स्वच्छता, आसन व्यवस्था, प्रसाधन गृह, वृक्षारोपण, दिवे, पावसाचे साठवलेले पाणी अशा सुख सोयी उपलब्ध केलेल्या आहेत. 

तालुक्यात आदिवासी अतिदुर्गम भागातील खेडोपाडी अजून ही स्मशानभूमी करीता प्रतिक्षा करावी लागतेय हे न उलगडणारे कोडे आहे. आदिवासी भागात दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र अनेक गावात स्मशानभूमी पर्यंत रस्ता नसल्याने चिखलातून वाट काढावी लागते, तर काही ठिकाणी नदीतून कमरे एवढ्या पाण्यातून मृतदेह वाहून घ्यावे लागतात. शेड नसल्याने उघड्यावर अंतिम संस्कार करण्यात येतात. अशा एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. 

हेही वाचा ! कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी “या” दिवशी करणार काँग्रेसमध्ये प्रवेश !

माळेगावच्या ग्रामपंचायतीत ७ गावे समाविष्ट असून माळेगांव, भरडमाळ, केळुणे, सालभोये, पिळूकपाडा, पाथर्डी,पारचापाडा या एकाही गावात स्मशानभूमी शेड उभारलेले नाही. त्यामुळे विना स्मशानभूमी विरहित एकमेव तालुक्यातील ग्रामपंचायत तर नाही ना असे म्हणण्याची वेळ आली आहे.

“माळेगांव ग्रामपंचायत मधील ७ गावांमध्ये एकाही गावात स्मशानभूमी शेड उभारलेले नाही. त्यामुळे विशेष त पावसाळ्यात आक्समिक निधन झाले तर सरण रचलायला खुप अडचणी निर्माण होतात. अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तरी जनसुविधा अथवा ठक्कर बाप्पा योजनेतून स्मशानभूमी शेड उभारून दिल्या स सोयीचे होईल.”

– यशवंत वाघमारे

पिळुकपाडा, सामाजिक कार्यकर्ते.

हेही वाचा ! ‘अजितदादा आमचं ऐका, नाहीतर गडबड होईल’ – शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सूचक इशारा !

“स्मशानभूमी शेड बांधण्याची मागणी अनेक वेळा जनसुविधा योजना, ठक्कर बाप्पा योजनेतून प्रस्ताव पाठवून मागणी करण्यात आली आहे. मात्र स्मशान भूमी न मंजूर करता सभामंडप मंजूर करण्यात आले आहे. नवीन प्रस्ताव सादर करुन स्मशानभूमी शेड उभारून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल.”

– मालती गवळी

ग्रामसेविका, माळेगांव


संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय