Sunday, March 16, 2025

डीवायएफआय पिंपरी चिंचवड शहर समितीच्या अध्यक्षपदी संतोष गायकवाड तर सचिवपदी अमिन शेख यांची निवड

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

पिंपरी चिंचवड : डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या (डीवायएफआय) पिंपरी चिंचवड शहर समितीच्या अध्यक्षपदी संतोष गायकवाड, सचिवपदी अमिन शेख यांची निवड करण्यात आली.

आकुर्डी येथील अधिवेशनात डॉ.ज्ञानेश्वर मोटे पुणे जिल्हा अध्यक्ष यांच्या उपस्थितीत शहराची नवी कार्यकारणी जाहीर करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य पुढीलप्रमाणे उपाध्यक्ष शिवराज अवलोल, सहसचिव भार्गवी लाटकर, स्वप्नील जेवळे, राहुल गोपीनाथन, विनोद चव्हाण, गौरव पानवलकर, ख्वाजा जमखाने, प्रफ्फुल कोडकर, ख्वाजा जमखाने शहीद भगतसिंग हॉल, आकुर्डी  येथे अधिवेशन संपन्न झाले.

अधिवेशनाची सुरुवात मावळते सचिव सचिन देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाली. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पुणे जिल्हा सचिव गणेश दराडे उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles