कोल्हापूर : संत बसवेश्वर यांच्या लोकप्रिय वचनावर आधारित मराठी भाषेमधील गीतांचा अल्बम नुकताच प्रदर्शित झाला आहे.’ तूच जगाचा सांगाती ‘ असे या अल्बमचे नाव असून सध्या युट्युब वर गाजत आहे.महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये सुप्रसिद्ध असणारे महान संत बसवेश्वर यांचा विचार या मातीत रुजण्यासाठी कोल्हापूर मधील काही तरुणांनी पुढे येऊन अनोख्या पद्धतीने बसववाणी सादर करीत आहेत.
महान संत महात्मा बसवन्ना यांची आजच्या समाजाला वेगळ्या पद्धतीने ओळख करून देण्यासाठी कोल्हापूर मधील गायक प्रल्हाद जाधव आणि गीतकार बाळासाहेब पाटील तसेच संगीतकार विश्वास सुतार ,संगीत संयोजन ओंकार सुतार, दिग्दर्शन संकलन प्रसाद महेकर आणि छायाचित्रण प्रशांत सुतार यांनी विधायक उपक्रम सुरू केला आहे .कन्नड भाषेतील मधले साहित्य मराठीत भाषांतरित करून त्यांचे वचन संगीतबद्ध केले आहे.
सेव्हन सेकंद कलेक्टिव फिल्म आणि टिनोस म्युझिक इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा अल्बम प्रदर्शित झाला आहे.याची निर्मिती आणि संयोजन यश आंबोळे यांनी केले असून हा त्यांचा दुसरा प्रयोग आहे. याआधी ‘हातातील कंकणासी’ या अल्बमला प्रेक्षकांनी अक्षरश डोक्यावर घेतले आहे.
हातातली कंकानासी अल्बम पाहण्यासाठी येथे क्लिक करा
काळाच्या ओघात बसव साहित्य एका ठराविक गटापुरतेच मर्यादित राहिले आहे परंतु निर्माता यश आंबोळे याच्यामते या साहित्याचा मराठी अनुवाद करुन बसव विचार महाराष्ट्राच्या मातीत पुन्हा एकदा रुजण्यासाठी हा छोटा प्रयत्न आहे. आपणही या यांच्या प्रयत्नांना भरभरून प्रतिसाद द्यावा आणि हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांनी पाहावा अशी महाराष्ट्र जनंभुमी न्यूज च्या प्रेक्षकांना विनंती.
व्हिडिओ पाहणयासाठी येथे क्लिक करा