पिरंगुट / दिपाली पवळे : संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल येथे आषाढी एकादशी निमित्त समाज प्रबोधन पर शैक्षणिक वारीचे आयोजन करण्यात आले. संस्कार स्कूल ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर पिरंगुट पर्यंत शिक्षक, विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा करून, टाळ मृदंगाच्या गजर करत, विठुरायाच्या नामघोष करत, ‘झाडे लावा झाडे जगवा’, ‘लेखी वाचवा विश्व वाचवा’, ‘ आरोग्य हीच संपत्ती’, ‘पाण्याचा वापर जपून करा.’ तसेच’ शिक्षण हीच संपत्ती ‘अशा घोषणा देत समाजप्रबोधन केले. (Sanskar School)
विठ्ठल रुक्मिणी ची वेशभूषा केलेले ‘सात्विक दयापुर ‘आणि ‘नव्या पांडे’ हे दोन विद्यार्थी वारीचे आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांनी विठुरायाचे अभंग म्हटले. फेर धरून फुगडी खेळत रिंगण करत आनंदाने विठू माऊलीच्या नाम घोष करत सामाजिक प्रबोधन पर करत संपूर्ण रॅली भक्तीमय वातावरणात काढण्यात आली. (Sanskar School)
यात पिरंगुट गावचे ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ यांनी सहभाग घेतला. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहा साठे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.


हेही वाचा :
गर्भवती महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर राखेत सापडली धक्कादायक वस्तू, सर्वत्र खळबळ
मोठी बातमी : आता वारकऱ्यांना मिळणार पेन्शन, वारकरी महामंडळाची स्थापना
मोठी बातमी : अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचारसभेदरम्यान गोळीबार
धक्कादायक : अंगणवाडीत शाळेत पोषण आहारात आढळले बेडक
निवासी आदिवासी आश्रमशाळांची वेळेबाबत आदिवासी विकास मंत्री काय म्हणाले पहा !