Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या मुद्द्यावरून राऊतांनी फडणवीस यांना निशाणा साधत, “फडणवीस तुमचे पूर्वज मुघलांची चाकरी करायचे; महाराष्ट्रात हा वारसा आणू नका, त्यामुळे ही फडणवीसी महाराष्ट्रामध्ये दाखवू नका”असा टोला लगावला.
संजय राऊत पुढे म्हणाले, “तुम्ही देशातील मुस्लिम समाजाला बदनाम करत ‘बटेंगे तो कटेंगे’ असे शब्द वापरता, पण महाराष्ट्रात हे धोरण चालणार नाही. शिवरायांचा गैरवापर थांबवा.फडणवीस तुमचे पूर्वज मुघलांची चाकरी करत होते आणि महाराष्ट्राशी गद्दारी करत होते. त्यामुळे ही फडणवीसी महाराष्ट्रामध्ये दाखवू नका”, अशा शब्दात संजय राऊत यांनी घणाघाती टीका केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान फडणवीस, शिंदे आणि पवारांनी दिल्ली दरबारी गहाण ठेवल्याचे स्पष्ट आहे.यामुळेच ते सतत दिल्लीला जाऊन झुकत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले, तर शिवाजी महाराजांचे मंदिर उभारण्याचे उद्धव ठाकरे यांचे आश्वासन आहे,” असेही राऊत म्हणाले.
तसेच राऊतांनी शरद पवारांच्या निवृत्तीबाबत दिलेल्या संकेताबद्दल भाष्य करत म्हटले की, “शरद पवार हे संसदीय राजकारणातील भीष्म पितामह आहेत. निवृत्तीचा विचार त्यांच्या मनात आला असला, तरी त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा समाजाला फायदा होईल. त्यामुळे त्यांनी निवृत्ती विचारांना दूर ठेवावे,” अशी विनंती त्यांनी केली.
शरद पवारांनी निवडणूक राजकारणात नवी पिढी आणण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे. “मी राज्यसभेत आहे, मात्र लोकसभा लढवणार नाही, आणि अजून किती निवडणूक लढवणार ? आत्तापर्यंत 14 निवडणुका लढवल्या. आणि तुम्ही असले लोक आहात की एकदाही घरी पाठवलं नाही. दरवेळी निवडूनच देताय. पण आता कुठेतरी थांबलं पाहिजे,असे म्हणत त्यांनी आपल्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहे.
Sanjay Raut
हेही वाचा :
राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर ; महाविकास आघाडीच्या ‘पाच गॅरंटी’ जाहीर करणार
मुख्यमंत्री शिंदेंच्या दहा मोठ्या घोषणा; राज्यातील बहिणींना मिळणार 2100 रुपये दरमहा
उद्धव ठाकरेंनी निवडणुकीपूर्वी दिली पाच मोठी आश्वासने
दिवाळीनंतर सोनं झालं स्वस्त ; ग्राहकांसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर
रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश
दिवाळीच्या फराळातून मतदारांना पैसे वाटप ; सांगलीत शरद पवार गटाचे उमेदवार अडचणीत
मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर