Photo : Twitter / Sanjay Raut |
मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांवर अनेक गंभीर आरोप केले. या आरोपांना भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. त्यानंतर आज सकाळीच संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.
सुप्रसिद्ध गायक संगीतकार बप्पी लहरी यांचे निधन
काल संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा निल सोमय्या या दोघांसह इतर भाजप नेत्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपानंतर आज संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे कि, “बाप बेटे जेल मधे जाणार! Wait and watch! कोठडीचे sanitization सुरू आहे.. जय महाराष्ट्र!” या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
बाप बेटे जेल मधे जाणार!
Wait and watch!
कोठडीचे sanitization सुरू आहे..
जय महाराष्ट्र!— Sanjay Raut (@rautsanjay61) February 16, 2022
मात्र, संजय राऊत यांचे हे ट्विट भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुला संदर्भात आहे की अन्य दुसऱ्या कोणा संदर्भात यावर जोरदार चर्चा सुरू आहे.
पंजाबी अभिनेता आणि लाल किल्ल्यावरील आंदोलनातील मुख्य आरोपी दीप सिध्दूचा अपघाती मृत्यू
लोकसेवा आयोगामार्फत पशुधन विकास अधिकारी पदांच्या एकूण २२४ जागा
बेरोजगारी विरोधात डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाची निदर्शने
व्हिडिओ : ‘या’ अभिनेत्रीने केला मुंबईच्या रस्त्यावर कचरा डान्स. जरूर पहा !