सांगली : लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन च्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी मिलिंद पोरे यांना आशा व गटप्रवर्तक यांच्या प्रश्नासंदर्भात निवेदन देण्यात आले. मागण्यांवर निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यात कोरोना १९ चा प्रादुर्भाव प्रमाणाबाहेर वाढला असून महाराष्ट्र सरकारने कडक निबंध जाहीर केले आहेत. प्रादुर्भावाचे प्रमाण वाढत असून मृत्यू दरांत सुध्दा बाढ होत आहे. म्हणुन कोरोना १९ आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सार्वत्रिक लसीकरणाची मोहिम हाती घेतली आहे. कोरोना १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने जी मोहिम हाती घेतली आहे, त्या कामामध्ये आशा स्वयंसेविकांचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्यवर्धिनी अंतर्गत असंसर्गजन्य पाच प्रकारच्या आजारांची माहिती त्यांना घ्यावी लागते. या कामासाठी शासनाकडून फक्त १० रू. मोबदला ठरवण्यात आला आहे. कोविड व्हॅक्सीन अंतर्गत ६० वर्षे वयाच्या व अतिगंभीर रूग्णांच्या याद्या तयार करण्याची जबाबदारी आशा स्वयंसेविकांवर टाकली आहे. तसेच या व्यतिरिक्त त्यांना नियमीतपणे आखून दिलेली ७२ पेक्षा जास्त कामे करावी लागतात.
आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्या पुढीलप्रमाणे :
१. आशा व गटप्रवर्तकांना नियमीत व कायम कर्मचा – याचा दर्जा देवून शासकीय वेतनश्रेणी व भत्ते लागू करा.
२. दिनांक १७ जुलै २०२० च्या शासकीय आदेशानुसार आशा स्वयंसेविकांच्या मानधनांत २००० रू. व गटप्रवर्तकांच्या मानधनात ३००० रू. ची प्रतिमाह वाढ करण्यात आली. परंतु नवी मुंबई , मुंबई व बहुसंख्य महानगरपालिकांनी ही मानधनवाढ अद्याप दिलेली नाही. ती विनाविलंब देण्यात यावी.
३. महाराष्ट्रातील काही महानगरपालिकामध्ये सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या कामानिमित्त रू . ३०० विशेष भत्ता देण्यात आला होता. नंतर ही रक्कम देण्यात आली नाही . महाराष्ट्रातील सर्व आशा ग्रामिण, नागरी व शहरी कोरोनाच्या कामात गुंतल्यामुळे हा रू. ३०० प्रतिदिन विशेष भत्ता महाराष्ट्रातील सर्व आशांना कोरोना असेपर्यंत लागू करावा.
४. कोरोना काळामध्ये आशा स्वयंसेविकांना दरमहा १००० रू. प्रोत्साहन भत्याची रक्कम देणे बहुसंख्य ठिकाणी डिसेबर पासून बंद करण्यात आले आहे. आशा स्वयंसेविकांना रू . १००० दरमहा हा प्रोत्साहन भत्ता पूर्वलक्षीप्रभावाने विनाविलंब देण्यात यावा. गटप्रवर्तकांना सध्या ५०० रू . दरमहा प्रोत्साहन भत्ता मिळतो . आशांना व गटप्रवर्तकांना समान प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा .
५. माझे कुटूंब माझी जबाबदारी मध्ये निर्देशित केलेली कामे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी दोन पंधरवाडयांत २६ दिवस काम केले आहे. परंतु त्यांना २६ दिवसांचा मोबदला मिळालेला नाही. त्यांना केवळ १० दिवसांचा मोबदला देण्यात आला आहे. त्यांना पूर्ण २६ दिवसांचा मोबदला देण्यात यावा.
६. आशा स्वयंसेविकांना कुष्ठरोग, क्षयरोग व सांसर्गिक रोग यांच्या सर्वेक्षणाचा थकित मोबदला देण्यात यावा.
७. आशा स्वयंसेविकांना टिबी ना मोबदला थोडयाफार प्रमाणात मिळत आहे. परंतु पोलिओ व लेपरसीना मोबदला अजिबात दिलेला नाही. डिसेंबर मध्ये केलेल्या लेपरसीच्या सर्वेक्षणाचा मोबदला दिला नसताना आता मार्च पासून नव्याने हा सर्वे आशांना लावण्यात आलेला आहे. या कामाचा मोबदला देण्यास विलंब करू नये.
८. आरोग्यवर्धिनी अंतर्गत भरण्यात येणा – या फॉर्मची रक्कम १० रू. ऐवजी तिपटीने वाढवण्यात यावी.
९. २० ते ४९ वयोगटातील महिलांना गर्भ निरोधक गोळया वाटप करण्यासाठी आशा स्वयंसेविकांना मिळणारा मोबदला दुप्पट करण्यात यावा.
१०. आरोग्यवर्धिनीमध्ये ज्या ठिकाणी लेखी नेमणूक झालेली नसतानाही आशांनी काम केले आहे, अशा आशा स्वयंसेविकांना कामाचा मोबदला देण्यात यावा.
१२. टीम बेस्ड् इंसेटिव्ह प्रोग्रॅम प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर एएनएम, अंगणवाडी सेविका, आशा यांच्या प्रमाणे गटप्रवर्तकांनाही सहभागी करण्यात यावे.
निवेदन देतेवेळी लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनचे हनमंत कोळी, मिना कोळी यांच्यासह आशा उपस्थित होत्या.