सांगली : सांगली येथे आज दि. २० डिसेंबर २०२१ रोजी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चे सांगली जिल्हा अधिवेशन पार पडले.
जिल्हा अधिवेशनाची सुरुवात पक्षाचा ध्वज जेष्ठ कॉम्रेड कॉ. वसंत कदम यांचे हस्ते फडकावून झाली. यावेळी मार्गदर्शक म्हणून कॉ. किसन गुजर व कॉ. उदय नारकर उपस्थित होते. कॉ. उमेश देशमुख यांनी जिल्हा समितीच्या कामाचा अहवाल मांडला.
जिल्हा समितीच्या कामाच्या अहवालावर चर्चा होऊन अहवाल सर्वानुमते स्वीकृत करण्यात आला. यावेळी ११ जणांची जिल्हा समिती निवडण्यात आली आणि कॉ. रेहाना शेख यांची नवीन जिल्हा सचिव म्हणून निवड करण्यात आली.
रेहाना शेख गेली अनेक वर्षे माकपच्या लढाऊ आणि निष्ठावंत कार्यकर्त्या आहेत आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या त्या महाराष्ट्र राज्य सहसचिव आहेत. त्यांनी आपले पूर्ण आयुष्य श्रमिक चळवळीला वाहून घेतले आहे. रेशनिंग, पाणीपुरवठा, महिलाच्या विविध प्रश्नांवर जनआंदोलने करून समस्या निवारण केले आहे.