Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC:सेवाभावी युवा नेते मधुकर बच्चे यांना संवाद व्यासपीठाचा कार्य कर्तृत्व पुरस्कार प्रदान

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:चिंचवड येथील सामाजिक,सेवाभावी युवा सामाजिक कार्यकर्ते मधुकर बहिरू बच्चे यांना संवाद व्यासपीठ या संस्थेच्या वतीने कार्य कर्तृत्व पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ते सतत सामाजिक,सांस्कृतिक,पर्यावरण संबंधित उपक्रम राबवत असतात.पिंपरी चिंचवड शहरातील सेवाभावी संस्थांचे ते सल्लागार,स्वयंसेवक आहेत.मनपाच्या जनसंवाद सभेच्या माध्यमातून नागरी समस्या निवारणासाठी ते सतत कार्य करत असतात.

---Advertisement---

समाजहीत डोळ्यांसमोर ठेऊन सतत जनतेचा जास्तीत जास्त फायदा करण्याची तळमळ ,आदी कार्याची दखल घेऊन मधुकर बहिरू बच्चे यांना कार्य कर्तृत्व पुरस्कार महासंसद रत्न मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .
या वेळी संवाद व्यासपीठचे संस्थापक अध्यक्ष हरेश अप्पा मोरे,युवा कीर्तनकार झी टॉकीज फेम जयश्री येवले,जागृत अपंग संघटना अध्यक्ष मानव कांबळे,जिल्हा नियोजन समिती सदस्य भारती विनोदे,अध्यक्ष जेष्ठ नागरिक संघटना विष्णुपंत तांदळे आदी मान्यवर उपस्थित होते
या वेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles