निगडी ( पिंपरी चिंचवड) : समतेचे वारकरी डॉ. जनार्दन मुनेश्वर यांचे दु:खद निधन झाले. ते फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील गाढे अभ्यासक व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे पिंपरी चिंचवड शाखेचे माजी सचिव, कार्यक्षम असे नेतृत्व केले.
त्यांना महाराष्ट्र शासन समाज भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, तसेच महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वैद्यकीय अधिकारी पुरस्काराने गौरवण्यात आले.
तक्षशिला मित्र संघ आकुर्डी प्राधिकरण, पुणे ते ज्येष्ठ सभासद होते। तसेच नांदेड जिल्ह्यातील पहिले MBSS डॉक्टर होते. संत गाडगेबाबा यांचा परीसस्पर्श लाभलेले डॉ. जनार्दन मुनेश्वर यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी वृद्धापकाळाने अकस्मात निधन झाले.
ज्या प्रियदर्शी सम्राट अशोक विजयादशमी १९५६ ला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दिक्षा दिली, त्या पवित्र समारंभाचे प्रत्यक्ष साक्षीदार डॉ. मुनेश्वर होते. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी तक्षशिला बौद्ध विहार प्राधिकरण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दोनवेळा आरोग्य शिबीर घेतले होते. असे कार्यकर्तुत्व असेलेल डॉ. मुनेश्वर होते.