घोडेगाव : घोडेगाव येथील आदिम संस्कृती अभ्यास, संशोधन व मानव विकास केंद्राच्या कार्यालयात हुतात्मा बाबू गेनू सैद यांना हौतात्म्यदीना निमित्त तरुण स्वातंत्र्य सैनिकाला अभिवादन करण्यात आले. (Ghodegaon)
हुतात्मा बाबू गेनू सैद यांनी वयाच्या २२ व्या वर्षी आपल्या प्राणाची आहुती देऊन देशातील जनतेला स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यासाठी एक प्रेरणा देण्याचे काम केले. त्यांना गांधीजींनी मांडलेले सामाजिक-आर्थिक-राजकीय युक्तिवाद आणि त्याचे महत्त्व समजले होते. याचाच अर्थ असा होतो की जर ब्रिटिश राजवट आर्थिकदृष्ट्या टिकाऊ नसली तर ती कोसळेल कारण ब्रिटीशांना भारतात त्यांचे राज्य चालू ठेवण्यासाठी फारसे प्रोत्साहन मिळणार नाही. म्हणून त्यांनी स्वदेशी चळवळ आणि परीकाय मालावर बहिष्कार घालण्यासाठी जो लढा दिला होता तो वैचारिक आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न होता.
या वेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी हुतात्मा बाबू गेनू सैद यांच्या फोटोला फुले वाहून अभिवादन केले व दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी निवृत्त पोलीस अधिकारी प्रदीपकुमार घोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले कि ‘देशातील जनतेने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या आणि या देशात अमुलाग्र बदल घडविण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य पणाला लावले त्यांचा प्रामाणिकपणा लक्षात आपणही देशातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रामाणिक लढा दिला पाहिजे. आभाळे फाटले असताना आपण आपल्या डोक्याच्या वर असलेले आभाळ तरी शिवण्याचे काम आपण केले पाहिजे आणि जन्म दिलेल्या मातीचे ऋण फेडायला हवे.’ कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिम संस्थेचे समीर गारे यांनी केले, यावेळी त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या दूरदर्शी भूमिकांवर भाष्य केले. (Ghodegaon)
यावेळी आदिम संस्थेचे दिपाली खामकर, राहुल कारंडे, बोरघर गावचे उपसरपंच राजू घोडे, सदस्य दिपक वालकोळी, निवृत्त पोलीस अधिकारी प्रदीपकुमार घोडे, ग्रामसेवक संजय जोशी, युवराज मते ज्ञानसरिता अभ्यासिकेचे विद्यार्थी अक्षदा लोहकरे, पूजा कसबे आदी विद्यार्थी उपस्थित होते.
(Ghodegaon)
हे ही वाचा :
ब्रेकिंग : जळगाव येथे बस-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक ठार, २१ जखमी
ब्रेकिंग : …म्हणून अल्लू अर्जुनला जेलमध्ये काढावी लागली रात्र
खुशखबर : लाडकी बहीण योजनेचा हप्ता ‘या’ दिवशी मिळणार, महत्वाची माहिती समोर
लोकसभेत प्रियांका गांधी यांची मोदी सरकार जोरदार टीका, राजा वेश बदलतो…
काश्मीर मध्ये मायनस तापमान, उत्तर भारतासह महाराष्ट्रात थंडीची लाट कायम
मोठी बातमी : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक, वाचा काय आहे प्रकरण !
मोठी बातमी : सर्वात कमी वयात डी. गुकेश ने वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकत रचला इतिहास