Thursday, April 25, 2024
Homeजिल्हासंत साहित्य अभ्यासक, भारूडकार राम चंद्र देखणे यांचे निधन

संत साहित्य अभ्यासक, भारूडकार राम चंद्र देखणे यांचे निधन

पुणे : संत साहित्य आणि लोकवाङ्मयाचे अभ्यासक, मराठी लेखक, प्रसिद्ध व्याख्याते, प्रवचनकार आणि भारूडकार डॉ. रामचंद्र देखणे यांचे आज पुण्यात  निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. सोमवारी सायंकाळी घरत पूजा करत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

देखणे यांनी पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या कार्यालयात जनसंपर्क अधिकारी होते. ३४ वर्षांच्या नोकरीनंतर ते ३०  एप्रिल २०१४ रोजी निवृत्त झाले.

रामचंद्र देखणे हे वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते. वडिलांच्या कीर्तनात ते लहानपणी अजाणतेपणी टाळकरी म्हणून उभे रहात आणि खड्या आवाजात अभंगातली चरणे म्हणत. त्यामुळे कीर्तन, प्रवचन, भजन आणि भारूड या कला प्रकारांशी ते आपोआप जोडले गेले. गावच्या जत्रेत किंवा पालखी, दिंडी सोहळ्यात रामचंद्र देखणे वेगवेगळी सोंगे आणून भारुडे करू लागले. त्यांनी प्रदीर्घकाळ एकनाथी भारुडाद्वारे समाज प्रबोधन केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय