Friday, December 13, 2024
Homeराजकारणकोरोना बरा होण्यासाठी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सुचवला अजब उपाय

कोरोना बरा होण्यासाठी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सुचवला अजब उपाय

(भोपाळ) :-  दिवसेंदिवस देशासह जगभरातील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या भारत कोरोनाच्या बाबतीत जगात तीन नंबर वर असून देशात 13 लाख 89 हजार 97 अशी कोरोना बाधितांची संख्या आहे. यासर्व परिस्थिती कोरोनावर लस काढण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ कामाला लागले असताना भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी हनुमान चालीसा म्हंटल्याने करोना बरा होईल असे म्हंटले आहे.

      प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी ट्विट करून म्हटलं आहे कि, “चला सर्वांनी एकत्र येऊन कोरोना साथीच्या आजाराची समाप्ती व्हावी या उद्देशाने आध्यात्मिक प्रयत्न करूया 25 ते 5 ऑगस्ट दरम्यान आपापल्या घरी रोज 5 वेळा हनुमान चालीसा म्हणा. रामललाच्या आरतीसह घरात दीप प्रज्वलित करुन समाप्त करू” असे त्यांनी म्हटले आहे.

   दरम्यान, या अगोदर सुद्धा अनेक नेत्यांनी यावर वादग्रस्त उपाय सुचवलेले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय