Sunday, July 14, 2024
Homeआंतरराष्ट्रीयरशिया युक्रेन युद्ध, युक्रेनची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव !

रशिया युक्रेन युद्ध, युक्रेनची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव !

                         

युक्रेन : रशिया आणि युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगावर चिंतेचा संकट दाटले आहे. आणि अशातच आत्मसमर्पण करण्यास नकार दिल्याने आज सलग चौथ्या दिवशी आक्रमणे करून रशियाची युक्रेनची आणखी कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे.

युक्रेन विविध राष्ट्रांना मदतीची याचना केली काही राष्ट्रांनी युक्रेनच्या बाजूने रशियाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला परंतु रशिया मात्र पुढे पुढे सरकत युक्रेन काबीज करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे यूक्रेनने रशियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये धाव घेतली युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलींस्की यांनी याबाबत माहिती दिली.

युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण, तर विद्यार्थ्यांचे ईतरही गंभीर आरोप

Kiss : चुंबनाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या एका क्लिकवर

युक्रेनच्या अध्यक्षांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात केलेल्या अर्जात असं म्हंटल आहे कि” यूक्रेन मधील नागरिकांच्या हत्येला रशियाला जबाबदार धरले पाहिजे. न्यायालयाने रशियाला त्वरित युक्रेन विरुद्ध कारवाई थांबवण्याचे आदेश देण्यात यावेत. या प्रकरणी पुढील आठवड्यात सुनावणी सुरू करण्यात यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान रशियाने युक्रेनचा चर्चेसाठी बेलारूस येथे आमंत्रित केले आहे परंतु युक्रेन चे अध्यक्ष झेलींस्की च्या मते बेलारुस मध्ये दगाफटका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते चर्चेसाठी नकार देत आहेत त्यांच्या मते रशिया बेलारुस चा वापर एका लष्करी तळ याप्रमाणे करत आहे. आम्ही त्या ठिकाणी चर्चा करू शकत नाही जर खरंच गंभीरपणे चर्चा करायची असेल तर त्यांना चर्चेचे ठिकाण बदलावे लागेल असेही म्हटले आहे.

युक्रेन मधील भीषण परिस्थितीत या जोडप्याने केले लग्न, कारण ऐकून तुम्ही व्हाल भावूक

राज्यात सर्व जिल्ह्यांत व तालुक्यात “या” दिवशी राष्ट्रीय लोकअदालत

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय