पुणे : रशिया युक्रेन युद्धामुळे खाद्य तेलाचे दर पुन्हा एकदा दीडशे रुपयांत पार जात आहेत. भारतात सूर्यफूल तेलबियांची 90 टक्के आयात येथूनच होते. त्यामुळे खाद्यतेल किमतीवर या युद्धाचे भीषण परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. भारत हा खाद्य तेलाची सर्वाधिक मागणी असणारा देश आहे.
भारताची सर्वाधिक मागणी पाम तेल त्यानंतर सोयाबीन आणि तिसर्या क्रमांकावर सूर्यफूल तेलाचे असते. परंतु तेलाचे जेमतेम उत्पादन भारतामध्ये होते, त्यामुळे दरवर्षी खाद्यतेलाची भारताला प्रचंड मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागते. यामध्ये सर्वाधिक आयात पाम तेलाची होत असून इंडोनेशिया वरून हे पामतेल मागवले जाते.
निराधार पेन्शन योजनेच्या रकमेत वाढ करा, किसान सभेची राज्य शासनाकडे मागणी
सोयाबीनचे तेल बहुतांश भारतातच तयार होते. परंतु यंदा त्याचे गणितही बिघडल्यामुळे सोयाबीनच्या तेल उत्पादनात पाच टक्क्यांची घट झाली आहे.
भारतातील एकूण तेलबियांच्या आयाती पैकी 70 टक्के तेलबिया युक्रेन आणि 20 टक्के तेलबिया रस्त्यावरून आयात होतात, परंतु युद्धजन्य परिस्थिती मुळे पंधरा दिवसात रशिया आणि युक्रेनमधील तेलबियांची आवक थांबली आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय स्तरावर सूर्यफूल तेलाचे दर 20 टक्क्यांनी वाढले आहेत. आता त्याचा परिणाम सर्व प्रकारच्या खाद्य तेलावर दिसून आलेला आहे.
इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक मध्ये विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !
“या” राज्याचे अधिवेशन मध्यरात्री २ वाजता होणार, इतिहासातील पहिलीच वेळ ठरणार