रशिया युक्रेन युद्धाची झळ आता शेतकऱ्यांना बसणार आहे.खरीप हंगामामध्ये महाराष्ट्र राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला खत टंचाईचे संकट भेडसावणार आहे. रासायनिक खत निर्मिती करणाऱ्या कारखान्यांना कच्च्या मालाची आयात पूर्णपणे बंद झाल्यामुळे भारत देशातील खत कारखाने सध्या बंद आहेत.
हे युद्ध जर असेच सुरू राहिले तर येणारा खर्च महागड्या दरांमध्ये कारखान्यांना खरेदी करावा लागेल. त्यामुळे खतांच्या किमती प्रचंड वाढतील आणि त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणार नाहीत. त्यामुळे खत कारखानदारांनी उत्पादन बंद केले आहे . याचा परिणाम मागील वर्षाचा शिल्लक साठा अधिक महाग दराने शेतकऱ्यांना विकला जाईल. शिवाय कारखानदारांचे ही खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल. आणि देशभरातील शेतकऱ्यांचे नुकसान हे अन्नधान्य टंचाई ला कारणीभूत ठरेल.