युक्रेन : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेन विरोधात सैन्याला स्पेशल ऑपरेशन करणाचे आदेश दिले आहे. शिवाय युक्रेनच्या सैन्याला आपले शस्त्रे खाली ठेवून घरी जा, अन्यथा रक्तपात अटळ असा इशारा पुतीन यांनी दिला आहे.
पुतीन यांच्याकडून युद्धाची घोषणा केल्यानंतर किवसह अनेक शहरांमध्ये मिसाईलने बॉम्ब हल्ले करण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे. तर संयुक्त राष्ट्राने पुतिन यांना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे.
महात्मा गांधी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती
Another blast lighting up the sky over Kyiv. pic.twitter.com/b9Gw0VKhql
— Alejandro Alvarez (@aletweetsnews) February 24, 2022
रशिया आणि युक्रेनमध्ये अनेक दिवसांपासून तणाव होता. रशियाने युक्रेनमधील दोन प्रदेशांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली. यानंतर अमेरिका आणि युरोपसह इतर देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादली आहेत.
एएफपी या वृत्तसंस्थेनुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युद्धाची घोषणा केली असून युक्रेनची राजधानी कीवमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या “या” मागण्या मान्य, कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे