मॉस्को : रशियाचा अद्यापही युक्रेनवर हल्ला सुरूच आहे, या युद्धाचा आजचा सातवा दिवस आहे. या युद्धानंतर रशियाच्या विरोधात अनेक देश एकत्र आले असून इतर देशांकडून रशियावर वितरण साखळी, बँकिग सेवा, क्रीडा क्षेत्र यांसह अनेक क्षेत्रांत निर्बंध लावण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर बँकिंगचे व्यवहार करण्याची रशियाची क्षमता घटविण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधून रशियाची हकालपट्टी, युरोपची हवाई बंदी, अमेरिकेतील विविध राज्यांमधून व्होडकाची हद्दपारी असे अनेक निर्बंध रशियावर लावले जात आहे.
‘कच्चा बदाम’ गाणे गाऊन रातोरात प्रसिध्द झालेले भुबन बड्याकर यांचा अपघात
काही देशांनी युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वित्झर्लंडकडून बँकिग क्षेत्रातील निर्बंध घालण्यात आले आहे, ‘स्पुटनिक’ आणि ‘आरटी’ या रशियाच्या वाहिन्यांवर फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ‘युट्यूब’ची बंदी घालण्यात आली आहे.
अमेरिकेतील विविध राज्यांमध्ये रशियाची व्होडका व अन्य उत्पादने दुकानांतून हद्दपार करण्यात आले आहे. किव्हमधील दूतावास फ्रान्सकडून बंद करण्यात आले आहे, अशा विविध पध्दतीने रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न जगभरातील देश करत आहे. मात्र, काही देशांनी अद्यापही तटस्थ भुमिका घेतली आहे.