Thursday, August 11, 2022
Homeजिल्हारुपाली अनिल ढमढेरे यांना मराठी विषयात "अ "श्रेणीसह एम्.फिल.पदवी प्राप्त

रुपाली अनिल ढमढेरे यांना मराठी विषयात “अ “श्रेणीसह एम्.फिल.पदवी प्राप्त

spot_imgspot_imgspot_imgspot_img

अहमदनगर : अहमदनगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयातील मराठी अध्ययन व संशोधन केंद्रांतर्गत अभ्यास संशोधन करुन रूपाली अनिल ढमढेरे यांना साविञीबाई फुले पुणे विद्यापीठाची मराठी विषयात एम.फिल.(विद्यापती) पदवी ‘अ’ श्रेणीसह नुकतीच प्राप्त झाली आहे.

शेवगाव येथील न्यू आर्टस् कॉमर्स ॲण्ड सायन्स काॕलेजचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. वसंत रघुनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास संशोधन करुन रुपाली ढमढेरे यांनी ‘दीनमिञकार मुकुंदराव पाटीलकृत’ होळीची पोळी ‘ या कादंबरीचा सामाजिक आणि वाङ्मयीन अभ्यास या विषयावरील शोधप्रबंधिका संशोधन केंद्राला आणि विद्यापीठाला सादर केली होती.

प्राचार्य डॉ.राजेंद्र शिंदे, प्राचार्य डॉ.पुरुषोत्तम कुंदे, संशोधन केंद्राच्या संचालिका प्रा.डॉ.माहेश्वरी गावित यांनी रूपाली अनिल ढमढेरे यांचे अभिनंदन केले आहे.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय