Monday, March 17, 2025

रोहित पवारांनी मोदी आणि नड्डांकडे केली आमदार पडळकर यांची तक्रार

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पवार विरुद्ध पडळकर असा वाद पेटलेला दिसतो आहे. सातत्याने एकमेकांवर टीका टिप्पणी केली जात आहे, मात्र दोन दिवसांपूर्वी पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. या घटनेनंतर पुन्हा पडळकर यांच्या समर्थकांनी सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केल्याने वाद आणखी वाढला होता. 

दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आ. पडळकर यांची तक्रार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

रोहित पवार यांनी म्हटले आहे की, विरोधकांचा सुद्धा सन्मान करण्याची महाराष्ट्राची एक स्वतंत्र राजकीय संस्कृती आहे आणि आज पर्यंत ही संस्कृती टिकून ठेवण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे. मात्र महाराष्ट्रातील भाजपचे एक ‘महान नेता’ यांनी शरद पवार यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहे, महिलांना देवी मानून त्यांची पूजा करण्याची आपली संस्कृती आहे, मात्र त्या महान नेत्याने महिलांचा देखील अपमान केला आहे. यात विशेष गोष्ट अशी की, राज्यातील कोणत्याही भाजप नेत्याने त्यांना समज दिली नाही ना त्यावर काही बोलले आहे.

हे राज्याच्या संस्कृतीसाठी चांगले नसून आमच्या सारख्या नव्या पिढीला भीती आहे की, असे महान नेते राज्यातील राजकीय संस्कृती खराब करतील, हे आम्ही होऊ देणार नाही, परंतु तुमच्या सारखा वरीष्ठ नेता यात योग्य ती भूमिका घ्याल ही आमची अपेक्षा आणि विनंती असल्याचे ट्विट आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles