Wednesday, August 17, 2022
Homeग्रामीणकेंद्राच्या शेतकरी धोरणाच्या विरोधात चांदवड तालुक्यात रास्ता रोको

केंद्राच्या शेतकरी धोरणाच्या विरोधात चांदवड तालुक्यात रास्ता रोको

spot_imgspot_imgspot_imgspot_img

चांदवड (सुनिल सोनवणे) : शेतकरी विरोधी कृषी कायदे, कामगार विरोधी श्रम सहायता व वीज दुरुस्ती विधेयक तसेच पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढ मागे घेण्यासाठी आज चांदवड येथे माजी आमदार शिरीष कोतवाल व शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन आहेर यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष तसेच किसान सभा त्यांच्या कार्यकर्ते यांनी हजेरी लावली.

 

यावेळी माजी आमदार शिरीष कोतवाल व नितीन आहेर यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर व नाकर्तेपणावर तसेच शेतकरी कृषी कायदे व कामगार विरोधी धोरणांवर सडकून टीका केली. केंद्र सरकार हे शेतकरी विरोधी असून जर शेतकऱ्यांना कायदे मान्य नाहीत तर ते तुम्ही लादण्याचा प्रयत्न का करतात? हे सरकार फक्त जातीयवादाचे विष पेरत असून सरकारच्या धोरणांवर कोतवालांनी घणाघात केला.

भाजप व्यतिरिक्त सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना या कृषी कायद्याविरोधात जनजागृती करावी लागेल व प्रत्येक गावात जाऊन याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे ही आपली जबाबदारी असून त्यासाठी तालुका दौरा आयोजित करण्याचे मत शिरीष कोतवाल यांनी व्यक्त केले.

 

चांदवड मार्केट कमिटी समोर रस्ता रोको…

 

● जनविरोधी कृषी कायदे कामगार विरोधी श्रम सहिता व वीज दुरुस्ती विधेयक मागे घ्यावे.

● पेट्रोल डिझेल व घरगुती गॅसची दरवाढ कमी करावी.

● शेतीमालाला उत्पादन आधारित बाजार भाव मिळण्यासाठी निर्यातीचे धोरण ठरविण्यात यावे.

या मागण्या करण्यात आल्या.

यावेळी चांदवड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. चांदवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बारवकर, चांदवड पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त केला.

या रस्ता रोकोच्या प्रसंगी शिरीष कोतवाल, नितीन आहेर, संजय जाधव, गणेश निंबाळकर, विलास भवर, संपतराव वक्ते, विजय जाधव, भीमराव निरभवणे, भीमराव जेजुरे, शहाजी भोकनळ, नंदू कोतवाल, भास्करराव शिंदे, परसराम निकम, कॉ. राजाराम ठाकरे, कॉ. अॅड. गुंजाळ, समाधान जामदार, राजाराम ठाकरे, प्रकाश शेळके, शिवाजी कासव, भावडू उगले, गुड्डू खैरणार, उत्तम ठोंबरे, काॅ. सारिका गुंजाळ, घमाजी सोनवणे, कॉ.तुकाराम गायकवाड, कॉ. गणपत गुंजाळ, वसंतराव देशमाने, दत्तू ठाकरे, सोमनाथ पगार, सुनील ठाकरे, विजय गांगुर्डे यांचेसह शेकडो कार्यकर्ते रास्ता रोकोसाठी उपस्थित होते.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय