पर्यावरण जागृतीसाठी २५ हजार युवकांची सायकल रॅली
वाहतुकीत बदल जाहीर
पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर
इंद्रायणी स्वच्छता जनजागृती मोहिमे अंतर्गत आमदार तथा भाजपाचे शहर अध्यक्ष महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘रीव्हर सायक्लोथॉन २०२२’ रॅलीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रविवारी (दि.२७ नोव्हेंबर) सकाळी पावणे सहा वाजता, भोसरी गावजत्रा मैदान येथे करण्यात येणार आहे, अशी माहिती कामगार नेते सचिन लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वाहतूक शाखेने यासाठी विशेष बदल केले आहेत.
भोसरी/ तळवडे/ निगडी वाहतूक विभाग :
१) पुणे- नाशिक हायवेवरील बाबर पेट्रोल पंप ते जय गणेश साम्राज्य चौक दरम्यान जाणारी लेन बंद करण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग: नाशिक- पुणे हायवे वरील जय गणेश साम्राज्य चौक (पांजरपोळ) ते बाबर पेट्रोल पंप दरम्यानच्या लेन मधून दुहेरी वाहतूक सोडण्यात येणार आहे.
२) कै. अंकुशराव लांडगे सभागृह येथून भोसरी स्मशान भुमी कडे जाणारा मार्गावर प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग: चांदणी चौक, पीएमटी चौक येथून टप्प्याटप्प्याने वाहतूक करण्यात येणार आहे.
३) भोसरी अंडरब्रिज गाव जत्रा मैदान येथून नाशिक महामार्गाकडे जाण्यास प्रवेश बंदी करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग: दिघी व भोसरी रोडने येणारी व नाशिक बाजूकडे जाणारी वाहतूक भोसरी ओव्हरब्रिजच्या उजव्या बाजूने वळविण्यात येणार आहे.
४) जय साम्राज्य चौक ते संविधान चौक (साने चौक) अशी स्पाईन रोड ची दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग: बोऱ्हाडे वस्ती (मोशी) या मार्गाने इच्छित स्थळी जातील तसेच स्पाईन रोडवरील सर्व्हिस रोडची वाहतूक टप्प्याटप्प्याने सोडण्यात येईल.
५) टेल्को रोडने अनुकूल चौकाकडे येणाऱ्या वाहतुकीस टाटा मोटर्स येथे प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग: सदरची वाहतूक गुलाब पुष्प बागेकडून इच्छित स्थळी जाईल.
६) एचडीएफसी कॉलनी कडून घरकुल कडे येणारी वाहतूक घरकुल कडे न येता केएसबी चौकाकडून कुदळवाडी ब्रिज वरून जातील.
७) थरमॅक्स चौकाकडून कृष्णा नगर कडे येणारी वाहतूक कृष्णा नगर कडे न येता दुर्गा चौक मार्गे त्रिवेणी नगर चौकाकडे वळतील.
८) संविधान चौकाकडे त्रिवेणी नगर कडून येणारी वाहतूक दुर्गा चौक मार्गे थरमॅक्स चौकाकडे वळविण्यात येणार आहे.
९) स्पाईन रोड चे सर्व्हिस रोडवर काही ठिकाणी अंतर्गत रस्त्यावरील वाहतूक चालू राहील.
दरम्यान, वरील मार्गांवर २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ५.३०वा ते ९ वा. पर्यंत वाहतुकीत आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार असल्याचं पालिकेने सांगितलं आहे.