पुणे / क्रांतिकुमार कडुलकर (दि 25) : ओला उबेर या भांडवलदार कंपन्यांच्या वतीने कॅब टॅक्सी व रिक्षा चालक-मालकांची आर्थिक फसवणूक सुरू असून याबाबत कठोर कारवाई करण्यात यावी. ओला, उबेर या भांडवलदार कंपन्यांच्या धरतीवर्ती सरकारच्या वतीने स्वतः मोबाईल ॲप विकसित करण्यात यावे, ओला उबेर कंपनीमध्ये चालणाऱ्या चार चाकी वाहनांचे दर वाढवण्यात यावे, यासह इतर विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र रिक्षा पंचायत, ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन, ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य, पुणे रिक्षा फेडरेशन, ऑटो जनता गॅरेज फोरम या संघटनांच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे, टेम्पो वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश झाडे, कृती समितीचे नेते बबलू आतिश खान, फेडरेशनचे महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी एकनाथ ढोले, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहराध्यक्ष मोहम्मद शेख कार्याध्यक्ष विलास खेमसे पाटील उपाध्यक्ष अर्शद अन्सारी, सचिव किरण एरंडे, पुणे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण शेलार, कार्याध्यक्ष अनिल शिरसाट, उपाध्यक्ष जाफर शेख, प्रदीप आयर, कुमार शेट्टी, शाहरुख सय्यद, जाफर शेख, वाशिम शेख, विल्सन मस्के, अकबर शेख, संतोष डंबाळे, असलम सय्यद, निशांत भोंडवे, स्वामी महालिंगम, चंदन अटक, राजाभाऊ मारणे, विजय पोळ, राजू इंगळे, रुपेश भोसले, विजय शेळके, श्रीनाथ गोरे,आदी उपस्थित होते. महिला रिक्षा चालक आशा पवार शिला गायकवाड, देखील यावेळी उपस्थित होत्या.

प्रादेशिक परिवहन अधिकारी, संजय भोर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले, यावेळी बाबा कांबळे म्हणाले, दसरा दिवाळी अत्यंत महत्त्वाचा सण आहे, परंतु या सणात तुझ्या काळात देखील आमच्यावरती आंदोलन करण्याची वेळ आली आहे. आमच्या भावना अत्यंत तीव्र आहेत तरीदेखील आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. सरकारने आठवड्याचे चालकांचे प्रश्न सोडवावेत अन्यथा पुढील काळामध्ये आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असे बाबा कांबळे म्हणाले.
बंदच्या नावाखाली गुंडागर्दी
काही बोगस संघटनांनी बंदच्या नावावर नावाखाली गुंड गर्दी करून, अनेक ठिकाणी प्रवाशासह गाड्या आढवल्या तसेच ओला उबेर मध्ये चालणाऱ्या ऑटो टॅक्सी चालकांना बोगस बुकिंग देऊन, त्यांना अनेक ठिकाणी बोलून घेतले व त्यांची फसवणूक केली तसे त्यांना शिवीगाळ व मारहाण केली आहे, गोरगरीब कष्टकरी ऑटो टॅक्सी चालकांवर बोगस संघटनेने केलेला अन्याय कदापि सहन केला जाणार नाही याचा जाहीर निषेध यावेळी करण्यात आला.
आनंद तांबे म्हणाले, आम्ही नुकताच दिल्ली दौरा केला. दिल्लीमध्ये रिक्षा इलेक्ट्रिक रिक्षा सीएनजी, रिक्षा पेट्रोल डिझेल रिक्षा सायकल रिक्षा अशाप्रकारे वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला असून दिल्ली सारखी परिस्थिती पुण्यामध्ये नको यामुळे इलेक्ट्रॉनिक रिक्षांना आमचा कायम विरोध राहील, शासनाच्या वतीने अतिरिक्त दंड घेतला जात आहे तो देखील रद्द करावा अशी मागणी देखील आनंद तांबे यांनी केली.