Saturday, May 10, 2025
---Advertisement---
---Advertisement---

निगडी येथील लोकमान्य टिळक चौकाला रिक्षा चालकांचा विळखा

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : निगडी येथे रस्त्याने पायी चालणाऱ्या नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. ऑटोरिक्षाधारक सैरभैर वळवतात. प्रवाशी पळविण्यासाठी दिवसभर ऑटोरिक्षा चौकात अक्षरशः घिरट्या घालत असतात. अतिशय वर्दळीचा ठिकाण असल्यामुळे याठिकाणी नेहमी गर्दी असते. रिक्षा चालकांना वेळीच पायबंद घातला नाही तर यात एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.

---Advertisement---

या ठिकाणी पहाटेच्या वेळी खाजगी बसेस येतात त्या बसमधील प्रवासी मिळविण्यासाठी रिक्षा चालक उलट्या दिशेने जोरात व सैरभैर चालवत असतात, त्यामुळे अनेकदा अपघातही झालेले आहेत.

शुक्रवारी पहाटे सहा वाजता एक ऑटो रिक्षा उलट्या दिशेने जाऊन एका स्कूटरला धडकली त्यामुळे दोघांमध्ये बराच वेळ बाचाबाची झाली, शिवाय वाहतूक ठप्प झाली. अशा प्रकरणात आजपर्यंत वाहतूक शाखेने अशी एकही कारवाई केलेली ऐकिवात नाही. राजरोसपणे असे प्रकार पिंपरी चिंचवड शहरात घडत असल्याने त्यांच्यावर पोलीस कारवाई का करत नाही हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. या लोकांवर नियंत्रण मिळवणे गरजेचे असून या लोकांच्या खाजगी वाहनामुळे वाहतूक कोंडी होते. या लोकांवर पोलीस काय कारवाई करणार हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

---Advertisement---

पोलीस आणि रिक्षावाले यांच्यातील आर्थिक हितसंबंध काही नवीन नाहीत. हा विषय जनतेत नेहमीच चर्चिला जात असतो. पण सर्वच पोलीस तसेच असतात असेही नाही. रिक्षावाल्यांच्या बेसिस्तपणामुळे प्रवाशांना मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते, हे जरी सत्य असले तरी त्याच रिक्षावाल्याच्या रिक्षातून प्रवास करण्यासाठी रस्त्यात घुटमळणारेही प्रवाशीच असतात. पहाटेच्या वेळी बाजूला जास्त याच रिक्षातून प्रवास केली जाते म्हणून त्यांना वाव मिळतो. शहरातील सर्वच बस स्थानक, रेल्वे स्थानकांच्या परिसरांत ही स्थिती आहे. वाहतूक समस्येने उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे बस्तान मांडणारे रिक्षावाले मुजोर झाले आहेत. रिक्षावाल्यांच्या रस्त्यावरील अरेरावी उद्योगास वेळीच चाप न लावल्याने आता ते नियंत्रणात राहातील ही शक्यता धूसरच !

– शिवानंद चौगुले

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles