Sunday, December 8, 2024
Homeग्रामीणदासरी माला दासरी समाज युवक संघटनेच्या कवाना शाखेची आढावा बैठक संपन्न

दासरी माला दासरी समाज युवक संघटनेच्या कवाना शाखेची आढावा बैठक संपन्न

हदगाव : नांदेड जिल्ह्यातील व हदगाव तालुक्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र नंदीश्वेवर महाराज मंदिर देवस्थान येथे दासरी माला दासरी समाज युवक संघटनेच्या कवाना शाखेच्या वतीने ६ ऑगस्ट रोजी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या बैठकीत बार्टी-समाज कल्याणच्या वतीने राबविण्यात येणारी युवा गट योजना याविषयी चर्चा झाली असून दासरी माला दासरी समाजाच्या न्याय हक्कांसाठी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष व्याख्यान देण्यात आले.

कवाना येथील प्रसिद्ध देवस्थान श्री नंदीश्वेवर महाराजांची महाआरती करून, व युवा गट योजनेसाठी श्रीफळ नारळ फोडून सामाजिक कार्याची सुरूवात करण्यात आली, सदर आढावा बैठकीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दासरी माला दासरी समाज युवक संघटनेचे राज्य सचिव सतीष चेपूरवार ह्यांनी केले तसेच प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त करत दासरी समाजा विषयी आपले विचार व्यक्त केले, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विनोद कांताराव चेपूरवार यांनी भूषविले, तसेच यावेळी विठ्ठल चेपूरवार उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अतिथी दासरी माला दासरी समाज युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा गंगाधर चेपूरवार, महासचिव पवन सादूलवार, माजी सरपंच गंगाधर गणपत ढाके, बसप्पा मारोती बोंबले उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.गंगाधर चेपूरवार ह्यांनी विशेष व्याख्यान पर भाषण करून महाराष्ट्र राज्यातील दासरी माला दासरी समाजाचा इतिहास, युवक संघटनेचे कार्य व युवा गट योजना याविषयी माहितीपर सविस्तर भाषण केले, त्यानंतर आभार प्रदर्शन सतीष चेपूरवार यांनी केले. 

 

या आढावा बैठकीसाठी कवाना येथील ग्रामस्थ, प्रतिष्ठित मान्यवर, तसेच महिला भगिनी वर्गाची मोठी उपस्थिती होती.

संबंधित लेख

लोकप्रिय