Wednesday, February 5, 2025

प्राधिकरणातील रहिवासीयांचा कचरा डेपो इतरत्र हलविण्यासाठी आमदार आण्णा बनसोडे यांच्याकडे साकडे

पिंपरी चिंचवड : प्राधिकरण निगडी परिसरातील डॉ. हेडगेवार भवन लगतच्या आवारात कचरा डेपो गेली अनेक वर्षापासून अस्तित्वात आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थानिक कर संकलन कार्यालयात दररोज परिसरातील नागरिकांची ये-जा असते. सुमारे 300 हून अधिक संख्येने कचरा वाहतूक करणारे बोलेरो, छोटे कचरा वाहतूक करणारे टेम्पो अवजड वाहने पहाटे सहाच्या सुमारात शहरभर कचरा संकलनाचे काम करतात. या मोकळ्या भूखंडावर चहुबाजूनी भंगारातील सर्व प्रकारच्या गाड्या, लोखंडी कचरा जमा करण्याचा हौदा, बंद स्थितीत अवजड वाहने मोठ्या संख्येने वर्षानुवर्षे या भूखंडावर पडून आहेत.

पावसाळ्यामध्ये येथील निकामी टायर,लोखंडी कचरा हौदामध्ये पाण्याचे डबके निर्माण होवून डेंग्यु डासांची उत्पत्ती होते. यापरिसरात अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला, तरूण, कंत्राटी काम करणारे कर्मचार्यांपना डेंग्यु रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने झालेला आहे. जमा करण्यात येत असलेल्या कचर्यारचा उग्र वास परिसरातील रहिवासी, नागरिकांना, रस्त्याने ये-जा करणार्याा पादचार्यांाना, लगतच्या मैदानात खेळणार्या  खेळाडूंना होत आहे. उग्रवासामुळे व कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकांनी मैदानी खेळाकडे दुर्लक्ष करून आपल्या आरोग्याची काळजी घेत आहे. ज्येष्ठ नागरिकांना घरातून बाहेर यायचे कसे हा प्रश्न भेडसावत आहे. 

घरकुल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

शहरातील सर्व प्रभागातील कचरा गाड्यातील कचर्याआच्या त्रास मात्र, रहिवासी व पादचारी, कर्मचार्यांवना होत असताना पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकारी, माजी आयुक्त, स्थानिक नगरसेवकांनी या गंभीर नागरीप्रश्नाकडे दुर्लक्ष केले असल्याचे निगडी-प्राधिकरण मंचाचे अध्यक्ष लालचंद मुथीयान, पदाधिकारी डॉ. रमेश बंन्सल, अनिल मित्तल, चंद्रकांत कोठारी, तुषार पवार, मनिष चुग, रानू सिंघानीया यांनी आमदार आण्णा बनसोडे यांच्या आज निदर्शनास आणून दिला. 

आमदार आण्णा बनसोडे यांनी सर्व जागेची पाहणी करून चर्चा केली. आजपर्यंत केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती घेवून तातडीने आपल्या परिसरातील चार ते सहा जणांचे शिष्टमंडळासमवेत पालिका आयुक्त तसेच, प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल, असे आश्वासन आ. बनसोडे यांनी दिले. परिसरातील रहिवासी मोठ्यासंख्येने यावेळी उपस्थित होते. आमदार आण्णा बनसोडे यांनी उपस्थित माजी महापौर आर.एस. कुमार, नगरसेविका शैलजा मोरे यांच्या समवेत ही प्रश्न तातडीने सुटावा याबाबत चर्चा केली.

– क्रांतिकुमार कडुलकर

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य !

महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा प्रयत्न – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

Related Articles

- Advertisement -

Latest Articles