Delhi New CM : दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर भाजप हायकमांड दिल्लीच्या नेतृत्वासाठी कोणाची निवड करणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. अखेर, भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांची दिल्लीच्या नवव्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. परवेश वर्मा (Parvesh Verma) उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
भाजपचे 27 वर्षांनंतर दिल्लीच्या सत्तेत पुनरागमन
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व कामगिरी करत 70 पैकी 48 जागांवर विजय मिळवला. 5 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडलेल्या या निवडणुकीची मतमोजणी 8 फेब्रुवारीला झाली. 27 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भाजपने पुन्हा एकदा दिल्लीच्या सत्तेवर आपला झेंडा रोवला आहे.
रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांच्या नेतृत्वाखाली नवा अध्याय
रेखा गुप्ता या 20 फेब्रुवारी 2025 रोजी रामलीला मैदानात दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची अधिकृत निवड करण्यात आली. या बैठकीला निरीक्षक म्हणून भाजप नेते रविशंकर प्रसाद आणि ओ.पी. धनखड उपस्थित होते. प्रवेश वर्मा, सतीश उपाध्याय आणि विजेंद्र गुप्ता यांनी रेखा गुप्ता यांच्या नावाचे प्रस्ताव मांडले, आणि नऊ आमदारांनी त्यास अनुमोदन दिले.
रेखा गुप्ता यांचा राजकीय प्रवास
रेखा गुप्ता यांनी 1992 साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) मधून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. 1996-97 मध्ये त्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या (DUSU) अध्यक्ष झाल्या. भाजपच्या संघटनेत त्यांनी दिल्ली भाजपाच्या महासचिव आणि भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदासह महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच, त्या दक्षिण दिल्ली महानगरपालिकेच्या महापौरही राहिल्या आहेत.
रामलीला मैदानात होणार शपथविधी सोहळा
दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांचा शपथविधी 20 फेब्रुवारी रोजी रामलीला मैदानात होणार आहे. त्यांच्या सोबत सहा मंत्री देखील शपथ घेतील. भाजपच्या या ऐतिहासिक पुनरागमनामुळे दिल्लीच्या राजकारणात मोठा बदल घडणार असल्याचे मानले जात आहे.


हे ही वाचा :
महिलांसाठी कॅन्सर प्रतिबंधक लस पाच ते सहा महिन्यांत उपलब्ध होणार
छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट होणार जागतिक वारसास्थळ
धक्कादायक : इंधनात ८०% पाणी २०% पेट्रोल मिसळून विक्री
ज्ञानेश कुमार देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त; काँग्रेसकडून तीव्र विरोध
तुमचं UPI व्यवहार अयशस्वी झाल्यास आता त्वरित रिफंड मिळणार
आयपीएल 2025 चे वेळापत्रक जाहीर, 22 मार्चपासून रंगणार खेळ
दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, पंतप्रधान मोदींनी केले आवाहन
ग्रामीण डाक सेवकांच्या रिक्त पदांसाठी भरती, वाचा संपुर्ण माहिती