Friday, March 28, 2025
---Advertisement---
---Advertisement---

ब्रेकिंग : राज्यात अध्यापकांच्या भरती प्रकियेस मान्यता, अशी होणार भरती

मुंबई : राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात आली असून, अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष निवड प्रक्रिया राबविण्यासाठी नवीन कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. (Professor Bharti)

---Advertisement---

राज्यपाल तथा कुलपती यांच्या मार्गदर्शनानुसार, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांसाठी गुणवत्ताधारित गुणांकन पद्धती निश्चित करण्यात आली आहे. नव्या प्रणालीत शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि अध्यापनाला ८० टक्के गुण (वेटेज) देण्यात येणार असून, मुलाखतीसाठी २० टक्के गुण दिले जाणार आहेत. एकत्रित १०० गुणांपैकी किमान ५० टक्के गुण मिळवलेल्या उमेदवारांनाच अंतिम निवडीसाठी पात्र ठरवले जाईल.

मुलाखतीच्या टप्प्यावर परिसंवाद, व्याख्यान प्रात्यक्षिक तसेच अध्यापन व संशोधनासाठी नवीनतम तंत्रज्ञान वापरण्याच्या क्षमतेचा विचार केला जाणार आहे. पारदर्शकतेसाठी निवड समितीच्या बैठकीचे दृक-श्राव्य चित्रिकरण करण्यात येणार असून, निवड प्रक्रियेनंतर सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीसह सीलबंद केले जाईल. विशेष म्हणजे, मुलाखती पूर्ण होताच त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर केला जाईल.

---Advertisement---

ही कार्यपद्धती सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांसाठी लागू राहणार आहे. यामुळे गुणवत्ताधारित भरती प्रक्रियेस गती मिळणार असून, उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. (Professor Bharti)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

मेगा भरती : भारतीय रेल्वे अंतर्गत तब्बल 32,438 जागांसाठी भरती (मुदतवाढ)

IDBI बँके अंतर्गत 650 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत 705 पदांसाठी भरती

युनियन बँक अंतर्गत तब्बल 2691 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा

बँक ऑफ बडोदा अंतर्गत तब्बल 4000 पदांसाठी भरती

भारतीय स्टेट बँक अंतर्गत तब्बल 1194 जागांसाठी भरती

मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत ‘कनिष्ठ सहकारी’ पदांसाठी भरती

Related Articles

- Advertisement -

Latest Articles