NCL Pune Recruitment 2025 : CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे (CSIR – National Chemical Laboratory, Pune) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NCL Pune Bharti
रिक्त पदांची संख्या आणि तपशील
CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे अंतर्गत कनिष्ठ सचिवालय सहाय्यक या एकूण 18 रिक्त जागांसाठी उमेदवारांना संधी आहे.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
संबंधित पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पदानुसार बारावी किंवा त्याच्या समकक्ष आणि संगणक टायपिंग आणि डीओपीटीने निश्चित केलेल्या विहित निकषांनुसार संगणक वापरण्यात प्रवीणता ही शैक्षणिक पात्रता असणे अपेक्षित आहे. (सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी जाहिरात पहा)
तसेच उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे निश्चित करण्यात आली असून SC/ST: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
अर्ज शुल्क आणि वेतनमान
CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे अंतर्गत अर्ज करण्यासाठी जनरल/ओबीसी/EWS साठी 500 रूपये अर्ज शुल्क असणार आहे. तर महिला, SC, ST तसेच PWD साठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 19,900 ते 63,200 पर्यंत पगार मिळेल.
नोकरीचे ठिकाण आणि अर्ज प्रक्रिया
नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे. तसेच उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, अर्ज करण्यासाठी CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या लिंकचा वापर करावा.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 5 मे 2025 असल्याने शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे आवश्यक असणार आहे.
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी असून, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.
CSIR Pune 2025
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 7719223351 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 मे 2025
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.